सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2700 ते 3300 ऊसदर मिळावा
23 ऑक्टोबर रोजी पंढरीत होणार ऊस परिषद

संपादक-दिनेश खंडेलवाल
ऊस दर आंदोलन संघर्ष समितीची केली स्थापना
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना एकत्र येत आज सोलापूर जिल्ह्यातील ऊस कारखानदार पुणे,सातारा, सांगली या धरतीवर सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ऊस दर द्यावा यासाठी ऊस दर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्याच बरोबर 23 ऑक्टोबर रोजी येथील शिवतीर्थावर ऊस दर परिषद होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली.
येथील रेष्टहाऊस मध्ये सोलापूर जिल्हातील शेतकरी संघटनेची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बळीराजा शेतकरी संघटना, जनशक्ती शेतकरी संघटना व इतर शेतकरी चळवळीत काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते.
येणार्या ऊस हंगामात शेतकर्याना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत कारण गेली चार पाच वर्षे झाली ऊस आंदोलने झाली नसल्याने त्याचा फायदा सोलापूर जिल्हातील साखर कारखानदारांनी घेतला कारण शेजारी पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा सांगली जिल्हा असेल त्याठिकाणी उसाला प्रती टन 2700 रुपये पासून ते 3300 रूपये भाव मिळतो मग आपल्या सोलापूर जिल्हात का मिळत नाही? अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यानी व्यक्त केली अणि एकत्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली.
या बैठकीत ऊस दर आंदोलन संघर्ष समिती स्थापन केली. या समिती मध्ये सर्व शेतकरी संघटनेचे दोन दोन पदाधिकारी घेतले आहेत. दरम्यान सोलापूर जिल्हातील ऊस पट्यात जाऊन शेतकर्यांना जागृत करून ऊस आंदोलन मध्ये सामील व्हा असे आव्हान करणार आहेत.
येत्या 23/10/2022 रविवार संध्याकाळी सहा वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात सोलापूर जिल्ह्याची ऊस परिषद घेणार आहेत आणि येणार्या हंगामात ऊसाला पहिली उचल किती घ्यायची हे जाहीर करणार आहेत.
यावेळी दिपक भोसले, माऊली हळणकर, सचिन पाटिल, समाधान फाटे,नितीन बागल,निवास नागणे,प्रा सुहास पाटिल, सचिन आटकळे,माऊली जवळेकर,नंदकुमार व्यवहारे, छगन पवार, गोपाळ घाडगे ,राहूल बिडवे,इतर महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.