
संपादक – दिनेश खंडेलवाल
वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी महा आरोग्य शिबिर २०२५ सज्ज
आयसीयू सेंटर, आर्थोपेडिक,नेत्र तपासणी सह आरोग्याच्या सर्व तपासणीसाठी महाआरोग्य शिबिरात लाभ
जाहिरात.. जाहिरात… जाहिरात… जाहिरात
पंढरपूर(प्रतिनिधी):- गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेले महाआरोग्य शिबिर यंदाही वारकरी रुग्णांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सज्ज ठेवण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मणी मातेच्या आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये वारकरी भाविक भक्त हे आळंदी ते पंढरपूर हे पायी चालत येत असतात. या वारकरी बांधवांना भावीक भक्तांना आरोग्य विषयी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. वारकऱ्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ जपण्याच्या उद्देशाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्य आरोग्य मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी प्रदीप नामदेव व धनंजय वाडा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरात रुग्णांना सर्वतोपरी उपचार व तपासणी करण्यात येत आहे. याचा लाभ पंढरपूर शहरांमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणारे भाविक भक्तांना होत आहे. 65 एकर या परिसरामध्ये हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे.
या ठिकाणी संपूर्ण वैद्यकीय सोयी सुविधा तसेच औषधे व अतिदक्षता कक्ष, नेत्र तपासणी, गुडघे व हाडाचे उपचार या सर्व आरोग्य विषयक सुविधा या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा लाभ वारकरी भावी भक्त रुग्णांना होणार आहे. कित्येक भाविक भक्त रुग्ण याचा लाभ घेत आहेत.
शासनाच्या वतीने पालक यातून येणाऱ्या भाविकांची तसेच पंढरीत देवशयनी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना आरोग्याच्या सर्व सुविधा योग्य प्रकारे व मोफत दिल्या जात आहे. या सुविधांसाठी वारकरी भाविक भक्तांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे.