
संपादक – दिनेश खंडेलवाल
अंगणवाडी सेविका मदतनीस या खऱ्या हीरकणी – डॉ. संगीता पाटील
एफ आर एस शंभर टक्के व हिरकणी कक्षासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सन्मान
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरामध्ये नुकतीच आषाढी यात्रा पार पडली या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पालखी मार्गासह पंढरपूर शहरात सुमारे वीस गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी महिला भाविकांच्या सोयीकरिता हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती व याची जबाबदारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत काम केल्याने त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एफ आर एस मध्ये शंभर टक्के काम केलेल्या ४३ अंगणवाडी सेविकांनाही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविका मदतनीस ह्याच खऱ्या अर्थाने हिरकणी असल्याचे प्रतिपादन डॉक्टर संगीता पाटील यांनी केले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी अधिकारी किरण जाधव जिल्हा सोलापूर पश्चिम,सौ.सारिका सणगर मुख्यसेविका,जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्या मार्गदर्शनानुसार प्रमुख पाहुणे डॉ.सौ. संगिता पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभी दिपप्रज्वलन करण्यात आले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.संगिता पाटील बोलत होत्या.
आषाढी यात्रा २०२५ मध्ये आलेल्या लाखो स्तनदा मातांसाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. सदर हिरकणी कक्षामध्ये पंढरपूर तालुका व माळशिरस तालुका मधील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत उपस्थित राहून स्तनदा मातांसाठी चांगल्या पद्धतीने सेवा प्रदान करून उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन प्रकल्पा कडून गौरविण्यात आले आहे. त्या सर्व हिरकणी महिलांचे मनापासून अभिनंदन चांगल्या कामाची चांगली पावती आज तुम्हाला मिळाली आहे. अशीच सेवा प्रदान करा अशा शुभेच्छा डॉ. संगीता पाटील यांनी दिल्या.
यावेळी बोलताना प्रकल्प अधिकारी किरण जाधव म्हणाले की प्रकल्पांतर्गत एफ आर एस प्रणाली तसेच पोषण ट्रॅकर चे चांगले काम अंगणवाडी सेविका यांनी केलेले आहे. यामध्ये आज आपण ४३ अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे असेच कार्य यापुढेही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्रकल्पाच्या मुख्य सेविका सौ.सारिका संणगर मॅडम म्हणाले की सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी चांगले काम केलेले आहे. आपले कामाच्या ठिकाणी सकाळी आठ पासून रात्री बारापर्यंत कोणतेही कारण न सांगता खऱ्या अर्थाने हीरकणी बनून काम केले. ही कौतुकास्पद बाब आहे. आपल्या कामाची पोचपावती आपल्या सन्मानाने आज मिळते आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. आपली जबाबदारी ओळखून कामकाज केल्याबद्दल अंगणवाडीतील सेविका मदतनीस यांचे हार्दिक अभिनंदन असेच कामकाज व्हावे यासाठी प्रकल्पाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.