संतांची भूमी पंढरीत रोज चंद्रभागेची आरती व्हावी
पवित्र चंद्रभागेच्या आरती प्रसंगी ह.भ.प.शिरसाठ महाराज यांचे विचार

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर ही संतांची भूमी असल्याने येथे चंद्रभागेची आरती रोज व्हावी या आरती मुळे भक्तांमध्ये सेवा भाव अधिक निर्माण होतो. प्रत्येकांची सेवा करने ही आम्हाला संतांनी दिलेली शिकवण आहे. त्यामुळे त्यांच्या पाऊलांवर चालणे हे सर्व वारकर्यांचे कर्तव्य आहे. असे विचार ह.भ.प.रविदास महाराज शिरसाठ यांनी व्यक्त केेले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने पवित्र चंद्रभागेची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून आषाढ शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर ह.भ.प. रविदास महाराज शिरसाठ यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी ह.भ.प. तुळशीराम कराड, उषा विश्वानाथ कराड, गोदावरीताई मुंडे, प्रा. स्वाती कराड चाटे, डॉ.सुचित्रा कराड नागरे, ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, दत्तात्रय बडवे आणि प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी ब्रह्मभूत रामचंद्र महाराज यादव यांची गुरू साखरे सांप्रदायिक विचार सागर या ग्रंथाचे प्रकाशन ह.भ.प. तुळशीराम कराड व उषा विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
ह.भ.प. रविदास महाराज शिरसाठ म्हणाले आज संपूर्ण जगात संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांचा संदेश पोहचला आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा विनम्रता शिकविते. आज आमच्या आई वडिलांच्या पुण्याईने आम्ही येथे पोहचलो आहोत. तसेच चंद्रभागेची आरती करण्याची जी संधी सर्वांना मिळाली आहे ते आपले परमभाग्यच समजावे.
ह.भ.प. शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले.