ईतरसामाजिक

पंढरपूर शहरात गणपती मुर्ती संकलनाचे १४ ठिकाणी केंद्र

संकलन केंद्रावर ५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर शहरात गणपती मुर्ती संकलनाचे १४ ठिकाणी केंद्र

संकलन केंद्रावर ५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पंढरपूर(प्रतिनिधी):- शहरातील घरघुती सह सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्ती गोळा करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहराच्या विविध भागात १४ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरत्या वाहनांची व संकलन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेच्या ५६ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली .

गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयारी पुर्ण केली असून, विसर्जन ठिकाणी पुरेसा प्रकाश व्यवस्था, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले आहे. सद्यस्थितीत उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून,नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन करताना दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या वेळी लहान मुलांना नदीपात्रापासून दूर ठेवावे. पावसामुळे घाटावरील पायऱ्या निसरड्या होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेवून सुरक्षित विसर्जन करावे, तसेच सुरक्षेच्यादृष्टीने विर्सजनासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवरच विसर्जन करावे असे आवाहनही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

[ विसर्जनासाठी गणेशमुर्ती याठिकाणी जमा कराव्यात…..
अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोलपंपा समोर, कॉलेज चौक बस स्टॉप जवळ, ठाकरे चौक, सावरकर चौक गजानन मेडिकल समोर, शिवतीर्थ शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलीस चौकी जवळ, मुक्ताबाई मठ, अंबाबाई पटांगण, अहिल्या पुलाजवळ टेभुर्णी रस्ता, यमाई तलाव गेट जवळ टाकळी रोड, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जवळ या ठिकाणी घरघुतीसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुर्ती गोळा करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close