सामाजिक

आमदार अभिजीत पाटील यांचेकडून माढा व पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा

पंढरपूरच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात केली विकास निधीसाठी मागणी

संपादक  – दिनेश खंडेलवाल 

आमदार अभिजीत पाटील यांचेकडून माढा व पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा

पंढरपूरच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात केली विकास निधीसाठी मागणी

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी हिवाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशी आमदार अभिजीत पाटील यांनी ‘अध्यक्ष महोदय’ असे म्हणत माढा मतदार संघाबरोबरच पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर वाचा फोडल्याने पंढरपूर नगरपालिकेची साखर पेरणी केल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रातून तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर येथे वारकरी येतात श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेत स्नान करतात परंतू शहरातील सोडण्यात येणारे घाण पाणी चंद्रभागेच्या नदी पात्रात जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी सोडले जाणे आवश्यक आहे.

पंढरपूर नगरपालिका मधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी नागरिकांनी पैसे भरले असून सन २०२१ पासून हे काम बंद आहे, त्याबाबत तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी.
पंढरपूर नाट्यगृह बांधकामातील भ्रष्टाचाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी.

पंढरपूर मोठे तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्रातून भाविकांसाठी १००० खटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबत जीआर निघाला असून त्याला मंजुरी देऊन जागा उपलब्ध करून देणे. तसेच मेडिकल महाविद्यालयास परवानगी देण्यात यावी. याबाबत प्रश्न उपस्थित केले.

यावेळी त्यांनी टेंभुर्णी नगरपंचायत संदर्भात अंतिम अधिसूचना काढण्यात यावी. माढा नगरपंचायत मधील जिल्हा परिषदेच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी निधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी व्यवसाय सुरू होऊ शकतील. तसेच शाळेसाठी कंपाउंड वॉल करावे, माढा तहसील कार्यालयाच्या फर्निचर साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

माढा शहरातील प्ले ग्राउंड गार्डनसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
माढा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. नाट्यगृह, एसटीपी प्लांट, माढेश्वरी देवी तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. टेंभुर्णी येथे ग्रामीण रुग्णालयात उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

टेंभुर्णी, करकंब आणि मोडनिंब येथे नगरपंचायत करण्यात यावी. पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं परंतु लहान मुलांना खेळण्यासाठी (गार्डन) बागेसाठी निधी मिळून देखील कामाला सुरूवात झाली नाही. कामास सुरुवात करण्यात यावी.पंढरपूर येथील यमाई तलाव येथे लेझर शो साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी अधिवेशनात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close