राजकिय

पंढरपुरातील मराठा भवनासाठी महेश साठेंनी आणखी दहा कोटींचा आणला निधी..!

शिवसेना नेते महेश नाना साठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपुरातील मराठा भवनासाठी महेश साठेंनी आणखी दहा कोटींचा आणला निधी..!

शिवसेना नेते महेश नाना साठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यातील पहिले मराठा भवन तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मंजूर करून घेऊन यासाठी सुरुवातीला पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर शिवसेना नेते महेश नाना साठे यांनी सदरचा निधी अपुरा असून आणखीन निधीची मागणी करत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मराठा भवनसाठी आता आणखीन दहा कोटीचा निधी आणला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या वादात पंढरपुरात मराठा भवन बांधण्यात यावे अशी मागणी पुढे आली. या मागणीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला. तात्काळ पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. मागील आषाढी यात्रेच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीत आले होते. यावेळी त्यांनी आणखी दहा कोटी रुपयांचा निधी या वास्तूच्या बांधकामासाठी देण्याचे वचन दिले होते.

डीपीडीसी सदस्य महेश नाना साठे यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीच्या मंजुरीचा शासन निर्णय त्यांनी काढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कामाबद्दल शिवसेना नेते महेश नाना साठे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांची कर्तव्य तत्परता आणि प्रामाणिकता याबाबत प्रसिद्ध आहेत. पंढरपूर येथे बांधण्यात येणाऱ्या
मराठा भवनच्या कामातून पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित झाली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील मराठा बांधवांनी मराठा भवन बांधण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीसाठी आले असता या मराठा भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ केला होता. या बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. यासाठी आणखी निधी कमी पडल्यास तोही देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूरकरांना दिलेला शब्द पाळला आहे. मराठा भवन या वास्तूसाठी आणखी दहा कोटी रुपयांचा निधी सरकारच्या मावळत्या कार्यकाळात मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री यांचे ओएसडी यांनी महेश साठे यांच्याकडे सुपूर्द केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पंढरपूरकरांसाठी अनोखी भेट असल्याची प्रतिक्रिया पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना समन्वयक महेश साठे यांनी व्यक्त केली आहे.

[ मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला……

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील मराठा बांधवांना दिलेला शब्द पाळला आहे. आणखी दहा कोटी रुपयांचा निधी मराठा भवनच्या बांधकामासाठी देण्यात येईल अशी घोषणा मागील आषाढी यात्रेवेळी केली होती. सरकारच्या मावळत्या कार्यकाळात त्यांनी हा शब्द पूर्ण करून, पंढरपूरकरांची मने जिंकली असल्याची प्रतिक्रिया महेश साठे यांनी दिली आहे. ]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close