ईतरक्राइम

पंढरपूर शहरात रिक्षा मध्ये अवैध गॅस भरताना दोघांना अटक

सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांची कारवाई

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर शहरात रिक्षा मध्ये अवैध गॅस भरताना दोघांना अटक

सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांची कारवाई

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात अवैधरीत्या रिक्षामध्ये गॅस भरुन तो विक्री करीत असताना शहर पोलीसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. तर गॅस टाकी, गॅस भरण्यााच कॉम्प्रेसर, वजनकाटा, एक रिक्षा असा ७६ हजार ६८० रुपये किंमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी अवैध गॅस भरणारी टोळी पकडण्यांसाठी पंढरपूर शहरातील गाडगे महाराज चौक ते विस्थापीत नगर कडे जाणा-या रोड लगत असलेल्या पत्राशेडमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथील पोलीस पथक पाठवून सदर पथकाव्दारे छापा कारवाई केली.

या ठिकाणी यातील आरोपी गणेश पोपट लिंगे रा. माळी वस्ती, टाकळी रोड, पंढरपूर व निलेश कृष्णा राजुरकर रा.हनुमान नगर, टाकळी रोड, पंढरपूर हे अवैधरीत्या गॅस रिक्षा मध्ये भरताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून घरगुती वापरासाठी लागणा-या गॅस टाकी, गॅस भरण्यााचे कॉम्प्रेसर, वजनकाटा, एक रिक्षा असा ७६ हजार ६८० रुपये किंमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक पंढरपूर उपविभाग प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिसाळ, पोलीस उपनिरीक्षक घुगरकर, पोह निलेश रोंगे, पोना विनोद शिंदे, पोकॉ राहुल लोंढे, पोकॉ शिवशंकर हुलजंती यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close