भल्या पहाटे पंढरीत सराईत २५ गुन्हेगारांची धरपकड
पंढरपूर शहर पोलीस पथकांची कोम्बिंग ऑपरेशन कारवाई

संपादक – दिनेश खंडेलवाल
भल्या पहाटे पंढरीत सराईत २५ गुन्हेगारांची धरपकड
पंढरपूर शहर पोलीस पथकांची कोम्बिंग ऑपरेशन कारवाई
पंढरपूर(प्रतिनिधी):- तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरांमध्ये गेल्या काही दिवसापासून कोयता गॅंग सक्रिय झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा छोट्या मोठ्या गुन्हेगारांनी रिल्स व स्टेटस ठेवून दहशत पसरवण्याचे कृत्य केल्याने आज भल्या पहाटे पोलीस पथकाने कोम्बिंग ऑपरेशन कारवाई
करत पंढरीतील सराईत २५ गुन्हेगारांची धरपकड केल्याने गुन्हेगारी मार्गावर असणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर उपविभागाचे सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे उपस्थितीत गणेशोत्सवाचे पार्श्वभुमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबविणेत आले. यामध्ये पंढरपुरात सुरू असलेल्या बेकायदेशीरपणे कोयत्यासह फिरून दहशत पसरविणा-या गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक धडक कारवाई करून त्यांची दहशत मोडीत काढणेकरीता त्यांची धरपकड करून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणून पंढरपूर उपविभागाचे सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से) यांनी ठोस व कडक कारवाई केली आहे.
यापुढे भविष्यात पंढरपूर शहर व परिसरातील सामान्य नागरिकांत कोणतीही दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास सदर गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपार यांसारखी कडक कारवाई करून गुन्हेगारी कृत्य करणा-यांचा बिमोड करणेत येणार आहे. दरम्यान बरेच तरूण गुन्हेगार हे इन्स्टाग्राम, युटयुब व सोशल मिडीयांवर गुन्हा व गुन्हेगारी याबाबतचे व्हिडीओ अपलोड करून दहशत पसरवित असलेने असे प्रकार करू नये असा इशारा देण्यात आला.
शहरात आगामी गणेशोत्सव,नवरात्र भक्तीमय, भयमुक्त व शांततापुर्ण वातावरणात पार पाडणेसाठी यापुढेही वेळोवेळी अशा प्रकारे ठोस कारवाई करण्यात येणार असेही सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से) यांनी सांगीतले.
सदरचे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान २ पांढरे रंगाच्या चारचाकी पिकअप, ५ मोटारसायकली तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील २५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून त्यांचेवर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करणेत आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से), अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से), व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे उपस्थितीत पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे, सपोनि भारत वाघे, पोसई श्रीकांत घुगरकर, श्रेणी. पोसई राजेश गोसावी, दप्तरी कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, विठठल विभुते, पोकॉ शहाजी मंडले, बजरंग बिचकुले तसेच पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे अंमलदार व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी केली आहे.