ईतरसामाजिक

पंढरपुरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम

मोहम्मद पैगंबर जीवणावर आधारित विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा;५० हजारावर बक्षीसाचे वितरण

संपादक – दिनेश खंडेलवाल

पंढरपुरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम

मोहम्मद पैगंबर जीवणावर आधारित विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा;५० हजारावर बक्षीसाचे वितरण

पंढरपूर(प्रतिनिधी):- मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची एक हजार पाचशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. जगभरात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण जगाला शांती, प्रेम, आपुलकी, बंधुत्व, आणि एकतेचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जगभरात विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील अलहुदा कमिटीच्या वतीने सीरते मुस्तफा कॉम्पिटिशन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित विविध किस्से, बयान, व कथा सांगण्यात आल्या. त्याचबरोबर हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण मानवता, बंधुता, एकता, ही तरुण पिढीमध्ये रुजविण्याकरिता विविध उपक्रम घेण्यात आले. तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित कथा मुला मुलींना सांगण्यात आल्या. यानंतर या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

वय वर्ष आठ ते ११ मुलांचा गट, वय वर्ष आठ ते ११ मुलींचा गट, वय वर्ष ११ ते १३ मुलांचा गट, वय वर्ष ११ ते १३ मुलींचा गट, वय वर्ष १३ ते १६ मुलांचा गट, वय वर्ष १३ ते १६ मुलींचा गट, असे वेगवेगळे गट करून वेगवेगळे टेस्ट पेपर मुलांना देण्यात आले होते. वयानुसार व गटानुसार त्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणी परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिले बक्षीस ५ हजार १०० रुपये, द्वितीय बक्षीस ३ हजार १०० रुपये तर तृतीय बक्षीस २ हजार १०० रुपये रोख रक्कम, मेडल व सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे प्रत्येक गटातील तीन तीन विद्यार्थ्यांना देण्यात आले.

प्रत्येक गटाकरिता वेगवेगळे बक्षीस ठेवण्यात आली होती. त्यामुळे तब्बल एकूण ५० हजार रुपयांची बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या व सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहले सुन्नत वल जमात पंढरपूर शहर, अलहुदा कमिटी पंढरपूर शहर, तसेच सिरते मुस्तफा कॉम्पिटिशन २०२५ संयोजक, स्टेशन मस्जिद समिती ट्रस्ट, पंढरपूर शहर व तालुका मुस्लिम समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close