ईतर

पंढरीत तुतारी साठी तीन दावेदार कोणाला मिळणार उमेदवारी?

परिचारक, भालके, सावंत तुतारी साठी इच्छुक

संपादक – दिनेश खंडेलवाल

पंढरीत तुतारी साठी तीन दावेदार कोणाला मिळणार उमेदवारी?

परिचारक, भालके, सावंत तुतारी साठी इच्छुक

पंढरपूर/दिनेश खंडेलवाल:- 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ तीन दावेदार असून तुतारी चिन्ह कोणाच्या पारड्यात पडणार याकडे आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघातून भाजपचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक मागील वेळी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले भगीरथ दादा भालके तसेच भैरवनाथ शुगर चे चेअरमन अनिल दादा सावंत या तीनही उमेदवारांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत.

विशेष म्हणजे तयारीला लागा असा संकेत शरद पवारांकडून मिळाल्यानंतर सर्वात अगोदर भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात संवाद यात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी तयार दर्शवली मतदारांचा आपल्याला आशीर्वाद आहे का? याची चाचपणी केली असता मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत.

भाजपमधून आपल्याला डावलले जात असल्याचे संकेत मिळत असल्याने लोकसभेत भाजपचे क्लस्टर प्रमुख म्हणून काम केलेले माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली. या मतदारसंघात आपण निवडणूक लढवणार असून मतदारांचा कौल जाणून घेताना प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांसह मतदारांनी त्यांना तुतारी हातात घ्या तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवा आम्ही आपल्या सोबत आहोत असे सांगितले आहे.

तर मंगळवेढा तालुक्यामध्ये भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे चेअरमन अनिल दादा सावंत यांनी या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला आहे. महिला वर्गातून निवडणूक लढवण्यासाठी विशेष आग्रह केला जात आहे. त्यांनीही आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. परंतु शरद पवारांचे तुतारी चिन्ह व पक्षाचे तिकीट मिळाले तरच आपण निवडणूक लढवणार आहोत अन्यथा पक्ष जो आदेश देईल ते आपणास मान्य असल्याचे स्वतः सांगितले आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आता प्रमुख तीन दावेदार तयारीत आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघातील मतदारांनी तिघांनाही निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दर्शवला असल्याने तसा रिपोर्टही पक्षाकडे गेला आहे. शरद पवार यांची भेट घेऊन तिनही उमेदवारांचे शिष्टमंडळ यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्याशी ही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी भारत भालके आमदार होते त्यांच्या निधनानंतर पोट निवडणूक लागली यावेळी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे हे निवडून आले होते. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने त्याच बरोबर दामाजी पंतांची मंगळवेढा नगरी असल्याने या मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असून मतदारांनी मात्र तिघांनाही आशीर्वाद देण्याचे भाकीत केले असले तरीही उमेदवारी साठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीची उमेदवारी देताना शरद पवार हे प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत माहिती घेऊन अभ्यास करून कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकणार याकडे आता मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close