पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सुरक्षा धोक्यात!
जखमी भाविकांच्या उपचाराचा खर्च मंदिर समितीने द्यावे;आरोपींवर कठोर कारवाई करावी हिंदुमहासभा व तीर्थक्षेत्र बचाव समितीची मागणी

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सुरक्षा धोक्यात!
जखमी भाविकांच्या उपचाराचा खर्च मंदिर समितीने द्यावे;आरोपींवर कठोर कारवाई करावी हिंदुमहासभा व तीर्थक्षेत्र बचाव समितीची मागणी
पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला महाराष्ट्र सह इतर राज्यातून भावी वारकरी दर्शनासाठी येत असतो. मात्र दिवसेंदिवस पंढरपूरात वारकरी भाविकांची सुरक्षा धोक्यात आलेली असून मंदिर सुरक्षा पोलीस यंत्रणा कुचकामी दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी काही तरुणांनी भाविकांवर मारहाण करून जखमी केले होते त्या भाविकांना सरकार व मंदिर समितीने उपचाराचा खर्च द्यावा तसेच आरोपींवर कोठारात कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू महासभा व तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान विठ्ठल मंदिराजवळ सात तारखेला दुचाकी गाडी धक्का सारख्या किरकोळ कारणास्तव भाविकांच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याचे कृत्य घडले आहे. हे तीव्र निंदनीय असून हिंदुमहासभा व तीर्थक्षेत्र बचाव समिती पंढरपूर याचा तीव्र निषेध करीत आहे. प्रशासन याबाबतीत पूर्ण उदासीन राहिले असल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी असेच केंद्रीय मंत्री यांचा ताफा वाहनाने एका भाविक मुलीला जखमी केले होते. मंदिर परिसरात भाविक हा वेगळ्याच भावावस्थेत असतो. त्याला मुक्त सुरक्षित वावरण्यासाठी या परिसरात सर्व प्रकारचे वाहनांना बंदी घालणे आवश्यक आहे. मंदिर परिसर हा केवळ पायी चालण्यापुरताच पाहिजे. अशी मागणी ही करण्यात आली.
मंदिर परिसरात पूर्वी रस्ता अरूद होता तरीही भाविक सुरक्षित राहत होते. कालांतराने रस्त्या रुंद करण्यात आला या ठिकाणी मंदिराच्या दोन्ही बाजूने मोठ्या वाहनांना बंदी आहे परंतु भल्या पाहते सुसाट वेगात मंदिर परिसरातून जाणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई करून अशा वाहनांना या ठिकाणी येण्यासाठी कायमची बंदी करावी. तरच वारकरी भाविक सुरक्षित राहणार आहे.
सदर घडलेल्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी व जखमींना सरकार व मंदिर समिती ने उपचारासाठी मदत करावी असे आवाहन हिंदुमहासभेचे शहर अध्यक्ष विकास मोरे, तीर्थक्षेत्र बचाव समितीचे उपाध्यक्ष माउली महाराज गुरव व अभयसिंह इचगांवकर यांनी केले आहे.