राजकिय

मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार आंदोलन;पंढरपुरातून मनोज जरांगे पाटलांची घोषणा

आरक्षण आंदोलनात बळ, शक्ती आणि आशीर्वादाची विठ्ठला कडे केली मागणी

संपादक – दिनेश खंडेलवाल 

मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार आंदोलन; पंढरपुरातून मनोज जरांगे पाटलांची घोषणा

आरक्षण आंदोलनात बळ, शक्ती आणि आशीर्वादाची विठ्ठला कडे केली मागणी

पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्याचे सरकार स्थापन होताच मराठा आरक्षणाची दिशा ठरणार असून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाची शक्यता आहे. असे विधान पंढरपुरात मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले की अंतरवली येथे घराघरातील मराठा सामूहिक आंदोलन करतील मात्र मुंबई येथे सामूहिक आंदोलन होऊ शकत नाही. राज्यातील मराठ्यांची लई इच्छा आहे. मात्र सरकार स्थापन होताच एकत्र बसून ठरवले जाईल असे म्हणत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारला इशारा देत आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसते. पंढरपूर येथे आज विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आरक्षण आंदोलनात बळ, शक्ती आणि आशीर्वादाची त्यांनी विठ्ठला कडे मागणी केली असल्याचे सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागावा यासाठी लवकरच पुढील दिशा ठरवणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी मराठा समाजाला म्हणालो होतो कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा, त्यांनी उमेदवार पाडले अन् निवडून आणले सुद्धा, मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो आम्ही जर मैदानात असतो आणि आमचे समीकरण जुळले असते तर यांचा सुपडासाफच केला असता. मी लोकसभेला पण तेच सांगितले होते. कोणालाही निवडून आणा आणि कोणालाही पाडा, मी माझ्या बोलण्यापासून लांब कधीही जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही. तसेच कोणाच्या दावणीला पण बांधू शकत नाही. मतदानाचा मालक समाज आहे. मी त्यांना शेवटपर्यंत मालक ठेवलं मी समाजावर कोणतीही मनमानी चालवली नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

सध्याच्या राजकीय घडामोडी वर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले सरकारच्या राजकारणाच्या प्रश्नावर मी बोलू शकत नाही. मी एवढे सांगतो की मी आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार सरकार मध्ये कोणी पण बसू देत ५० ते ५५ टक्के आम्ही त्यांचे पळता भुई थोडी करू, आत्तापर्यंत अंतरवली येथे निवडून आलेले ३० ते ३२ आमदार मला येऊन भेटून गेले आहेत. राज्याचे सरकार स्थापन झाल्यावर अजून येतील, मुख्यमंत्रीपद कोणालाही मिळू देत परंतु गोरगरीब जनतेला याचे सुख नाही, गोरगरीब जनतेची कामे करा नाहीतर जनता मुंडक्यावर बसत असते असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यात येणारा मुख्यमंत्री बहुजनाचा, हिंदुत्ववादी, अथवा पुरोगामी विचाराचा आला किंवा कोणीही आले तरी गेल्या ७५ वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधीच सुख मिळाले नाही. असे ते म्हणाले आरक्षणाची दिशा ठरवताना अंतरवली अथवा मुंबई येथे आमरण उपोषण होणार असून आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close