
संपादक – दिनेश खंडेलवाल
सकल नाभिक समाजाच्या वतीने जिवबा महालेंची जयंती साजरी
३९० व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील सकल नाभिक समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ असलेले वीर जीवबा महाले यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छञपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक ” होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ” ही म्हण सवर्ण अक्षरात इतिहासात ज्यांच्या कार्यामुळे लिहिली गेली असे स्वामीनिष्ट दानपट्टा बाजी शुरविर शिवरत्न वीर जिवबा महाले यांच्या ३९० व्या जयंती निमित्त पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने श्री.संत सेना महाराज मठ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प.बबन काका शेटे, डॉ.अशोक माने,डॉ.प्रदिप भोसले,नावनाथ जगताप यांच्या हस्ते जिवबा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे जिवबा महाले यांच्या जयंती निमित्त सर्व वृद्धांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
त्या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटक जितेंद्र भोसले, श्री संत सेना महाराज समाधी सोहळा्याचे अध्यक्ष निलेश शिंदे,सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष दत्तात्रय भुसे, पंढरपूर तालुकाध्यक्ष विनोद जगताप,उपाध्यक्ष सुनिल माने,पंढरपूर शहर सलून दुकान मालक संघटनेचे चेअरमन साईनाथ शिंदे,व्हाचेअरमन अनिल शेटे,दिपक सुरवसे, सखाराम खंडागळे,मनोज गावटे, बाळासाहेब शेटे स्वरुप चव्हाण, अभिजीत चव्हाण हे समाज बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश भाऊ चव्हाण व तुकाराम चव्हाण यांनी मोलाचे परिश्रम घेतले.