पांडुरंग ने दीला सर्वाधिक २७२५ रुपये ऊस दर;रयत क्रांतीच्या वतीने परिचारकांचा सन्मान
साखरेसह इतर पदार्थाचा दर वाढल्यास सभासदांना यापेक्षा जास्त दर देऊ- परिचारक
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना उसाचा सर्वाधिक दर २७२५/ रुपये जाहीर केला त्याचबरोबर पांडुरंग कारखान्याला डेक्कन शुगर असोसिएशन चा सण २०२१-२०२२ चा सर्वोत्कृष्ट उद्योग पुरस्कार नुकताच मिळाला असल्याने कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांचा रयत क्रांती च्या वतीने सन्मान करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याचे नेते व श्री पांडूरंग सह साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी श्री पांडूरंग कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवून कारखान्यास उत्कृष्ट पुरस्कार मिळवून दिला. सोलापूर जिल्ह्यात येणार्या हंगामात सभासदांच्या ऊस गाळपासाठी सर्वात जास्त ऊस दर म्हणजेच रुपये २७२५/ जाहीर करून ऊसदराची कोंडी फोडली आहे. खरेतर पांडूरंग कारखान्याचा उत्पादन खर्च जास्त असताना व पांडूरंग साखर कारखान्याला जवळ पास १०० टक्के ऊस पंढरपूर तालुक्यातील असून एवढा मोठा वाहतूक खर्च असताना सोलापूर जिल्ह्यात एक नंबर दर देण्याचे धाडस प्रशांत परिचारकांनी केले आहे. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचारानेच प्रशांत परिचारक कारखान्याचा कारभार करत आहेत.
यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की येणार्या काळात साखरे दर व इतर पदार्धाचे दर वाढले तर पांडुरंग कारखाना ऊस उत्पादक शेतकर्याना याही पेक्षा जास्त दर देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष सुनिल पाटिल, युवा आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्ष रूपेश वाघ यांच्या हस्ते फेटा,शाॅल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला.
सदर सन्मान प्रसंगी
सोमनाथ पाटिल, वैभव लिंगे,रुपेश वाघ, विनोद कुंभार,धनाजी वाघ,रहीम मुलाणी,सोमनाथ शिंदे सह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.