पत्रकारांच्या प्रश्नावर तडजोड नाही;प.म.प्र. रामचंद्र सरवदे आक्रमक भूमिकेत
राज्यपालांची भेट घेऊन पत्रकारांचे गंभीर प्रश्न मांडणार;न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार!

संपादक-दिनेश खंडेलवाल
पत्रकारांच्या प्रश्नावर तडजोड नाही;प.म.प्र. रामचंद्र सरवदे आक्रमक भूमिकेत
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य
राज्यपालांची भेट घेऊन पत्रकारांचे गंभीर प्रश्न मांडणार;न्याय हक्कासाठी
पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार!
पंढरपूर : पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने राज्यातील पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,जेष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना, पत्रकारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकरिता विमा योजना, स्वतः च्या मालकीची पक्की व हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना, यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृतपत्रांना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात, खंडणी व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राज्यातील ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते रद्द करून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमणे आदि प्रश्नाबाबत न्याय मागत आहे परंतु राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची तयारी ठेवली असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी करणे, पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी,मारहाण आदि करणार्यांवर नवीन पत्रकार कायद्यान्वये गुन्हे दाखल व्हावेत, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे, राज्यातील सर्वच युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता मिळावी, कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत इत्यादी पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य वेळोवेळी आंदोलन,उपोषण,निवेदन करत असून राज्यसरकार ला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही का? असा खोचक प्रश्न पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी राज्यसरकार ला विचारला असून पत्रकार सुरक्षा समिती ने आजपर्यंत दिलेल्या निवेदनाची राज्याच्या राज्यपाल महोदयांनी तात्काळ दखल घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घ्यावेत अशी मागणी देखील लावून धरणार आहे. असेही ते म्हणाले.
राज्याचे राज्यपाल यांनी राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील व गंभीर होत असल्यामुळे राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी देखील केली असून आता राज्य सरकार ने राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत गंभीर होण्याची गरज आहे. राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत आपण यापुढे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत पत्रकारांच्या प्रश्नाबाबत तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे.
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत राज्यपाल महोदय यांची राजभवन मुबंई येथे लवकरच भेट घेणार असून राज्यातील पत्रकारांच्या गंभीर प्रश्ना बाबत न्यायमागू मात्र यासाठी आपण तडजोड करणार नसल्याचे परखड मत पत्रकार सुरक्षा समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे.