पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावू रामचंद्र सरवदे
पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची निवड

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
सोलापूर : पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कार्य करू अशी ग्वाही नूतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी दिली. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की पत्रकारिता करत असताना पत्रकारांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाचे कार्य करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अशा वेळेस पत्रकारांवर अन्याय होत असतो परंतु पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अन्याय होणार्या पत्रकारांवर वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार सुरक्षा समिती करत आहे. पत्रकारांच्या घराबाबत तसेच इतर प्रश्नासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर येथे बैठक घेण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार होते. या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा,ज्येष्ठ पत्रकार पेन्शन योजना, घरकुल योजना , विमा योजना , पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण , राज्यातील यूट्यूब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता , पत्रकारांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी , यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, त्याच बरोबर , कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास शासकीय मदत व शासकीय सेवेत समाविष्ट करणे , यासह पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष आप्पाशा म्हेत्रे यांच्या हस्ते फेटा,शाॅल व नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राम हुंडारे , अन्सार तांबोळी (BS) , अक्षय बबलाद , दत्ता पवार. नागनाथ गणपा , वैजिनाथ बिराजदार , सादिक शेख , इस्माईल शेख , प्रसाद ठक्का , सिध्दार्थ भडकुंबे , श्रीनिवास पेडी ,रोहित घोडके , रवी मन्हळ्ळी , विवेकानंद खेत्रि , लक्ष्मण गणपा ,अरुण सिडगिद्दी , अशोक कांगुडे , राजू येरगुंटला , श्रीनिवास वंगा , श्रीकांत बल्ला , श्रीकांत कोळी , नागमणी वग्गु , सूर्यकांत व्हनकडे , मुक्तम गौडा पाटील तसेच पंढरपूर शहर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील , उपाध्यक्ष विजय कांबळे , सचिव विश्वास पाटील , रवींद्र शेवडे , सहसचिव रफिक अत्तार , चैतन्य उत्पात , बाहुबली जैन आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com