
संपादक – दिनेश खंडेलवाल
बेकायदेशीर जुगार, मद्य अड्ड्यावर कारवाई;२ कोटी ६८ लाखांवर मुदद्देमाल जप्त
सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाची कारवाई
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पणे जुगार कसीनो चालवले जातात तर देशी-विदेशी मध्य अवैधरित्या विक्री केली जाते. यावर आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून सांगोला तालुक्यातील सोनंद येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेला जुगार कशी मध्य अड्ड्यावर पोलिसांनी ५० जणांवर कारवाई केली. यामध्ये सुमारे २ कोटी ६८ लाख, ७२ हजार,१९५ रुपयाचा मुद्द्यामाल जप्त केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…..
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मौजे सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर येथे हॉटेल मटन भाकरी च्या सिमेंट पत्राचे खोलीत सचिन साहेबराव काशिद रा. सोनंद ता. सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा. आथणी जि. बेळगाव हे दोन व्यक्ती विनापरवाना जुगार क्लब चालवित आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करणेबाबत पंढरपूर विभागास आदेशीत करण्यात आले होते.
दरम्यान पंढरपूरचे सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी सांगोला पोलीस ठाणेस ४६/२०२५ नोंद करुन सांगोला पोलीस ठाण्याचे ४ पोलीस आपल्या पथकाचे सोबत मौजे सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर येथे जावून मटन भाकरी हॉटेल च्या पाठीमागील सिमेंट पत्र्याचे खोलीत अवैधरीत्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी धाडसी छापा कारवाई केली.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
मौजे सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर याठिकाणी सुरु असलेले मटन भाकरी, हॉटेलच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्र्याचे शेडमध्ये ५० इसम हे ५२ पत्याचा पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना मिळून आले. तसेच कसिनो काउंटरमध्ये अवैधरीत्या बेकायदेशीर देशी-विदेशी दारु ही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आली आहेत.
सिमेंटच्या पत्रा शेड मध्ये पत्ते खेळण्याकरीता आलेल्या व्यक्तींकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, पत्यातील रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, ५२ पानी पत्याचे डाव, पत्राशेड मध्ये असलेल्या खुर्च्या, टेबल, कपाट पेटी, पत्याचे डाव असलेले बॉक्स, कुलर, पैसे मोजण्याची मशीन, ताब्यात घेण्यात आली.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
या कारवाईत रोख रक्कम १६,०९,४८० रुपये, ६२ मोबाईल अंदाजित किंमत १३,९१,१०० रुपये, २६ चारचाकी वाहनाची किंमत २ कोटी ९ लाख रुपये, ६१ दुचाकी वाहनाची किंमत -२९ लाख ६० हजार रुपये, देशी विदेशी दारु किंमत ११ हजार १६५ रुपये असा एकुण २ कोटी ६८ लाख ७२ हजार १९५ रुपये चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला.
त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस वरील ५० इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४,५ व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत गडळे, पंढरपूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि विभावरी रेळेकर, पोसई भारत भोसले, पोसई अनिल पाटील, श्रेणी पोसई दत्तात्रय तोंडले, पोह निलेश रोंगे, पोह कामतकर, पोहेकॉ मंगेश रोकडे, पोह सुजित उबाळे, पोह अरुण कोळवले, पोह सातव, मपोहेकॉ शितल राउत, मपोहेकॉ शितल राउत, पोना संतोष गायकवाड, पोना सिताराम चव्हाण, पोना शिंदे, पोना ढोणे, पोकॉ गुटाळ, पोकॉ गवळी, पोकॉ राहुल लोंढे, पोकॉ आवटे, पोकॉ जाधव, पोकॉ मदने, पोकॉ हुलजंती यांनी पार पाडलेली आहे.