पोलीस बांधवांना दोन हजार मास्क,१५०० इनर्जी पावडर,इमर्जनसी औषधे व मेडीकल साहीत्याचे वाटप
पंढरपूर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा उपक्रम
संपादक-दिनेश खंडेलवाल
पोलीस बांधवांना दोन हजार मास्क,१५०० इनर्जी पावडर,इमर्जनसी औषधे व मेडीकल साहीत्याचे वाटप
पंढरपूर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा उपक्रम
पंढरपूर :- आषाढी देवशयनी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात बंदोबस्तासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पोलिसांना स्व:संरक्षण व आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने मास्क एनर्जी पावडर व मेडिसिनचे किट देण्यात आले.
आषाढी यात्रेचे औचित्य साधून येथील तालुका कार्यकारिणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापुर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या हस्ते पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांना दोन हजार मास्क,१५०० इनर्जी पावडर,इमर्जनसी औषधे व मेडीकल साहीत्याचे वाटप करण्यात आले.
वारकरी बंधू भगिनींना पायी चालत येताना थकवा दूर होण्यासाठी पाणी वाटप सोलापूर जिल्हाध्यक्ष दिनेश काटकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष कैलास कारंडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे, पंढरपूर तालुका महिलाध्यक्षा शोभा बडवे, भाळवणकर सर, चव्हाण सर, कु. ऋतुजा उत्पात, वाघमारे सर, मुजावर सर सह सर्व पंढरपूर पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर तालुका कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले.