सामाजिक

अन्यथा तीर्थक्षेत्र पंढरीचा कर्नाटकात समावेश करा;महापूजेला तेथील मुख्यमंत्र्यांना बोलावू

कॉरिडॉर रद्द करण्यासाठी स्थानिकांची मागणी

संपादक-दिनेश खंडेलवाल

अन्यथा तीर्थक्षेत्र पंढरी कर्नाटकात समावेश करा;महापूजेला तेथील मुख्यमंत्र्यांना बोलावू

कॉरिडॉर रद्द करण्यासाठी स्थानिकांची मागणी

पंढरपूर- वारंवार एकाच परिसरात विकासाच्या नावाखाली रूंदीकरणाचा घाट घातला जात असेल तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कर्नाटक राज्यात समावेश करावा अशी संतप्त मागणी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक व व्यापार्‍यांनी केली असून पंढरपूर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढील वर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीच्या वतीने आज पश्‍चिम व्दार येथे महिला व पुरूषांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

राज्य सरकारने श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर करण्याची घोषणा केली असून यास येथील स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. याची दखल घेवून पालमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी व्यापारी व बचाव समितीच्या सदस्यांसमवेत बैठक घेतली होती. यामध्ये अधिकार्‍यांनी दिलेल्या आराखड्या प्रमाणेच आम्ही देखील वारकर्‍यांना व स्थानिकांना अपेक्षित असलेला विकासाचा आराखडा सादर करण्याची तयारी दर्शवली होती. यास पालकमंत्री यांनी एक महिन्याचा मुदत देत सदर आराखडा प्रशासनास सादर केल्यानंतर पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यापूर्वीच शासनाने दीड हजार कोटी रूपयाच्या कामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रसिध्दी केली आहे. तर पंढरपूर नगरपरिषदेकडून मंदिर परिसरात रस्त्याची लांबी, रूंदी, घरांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले असताना देखील आराखड्याची कामे प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याने बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी मंदिरा नजिक पश्चिमद्वार शेजारी ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान यावेळी स्थानिकांनी सकाळ पासून भजन आंदोलन सुरू केले होते. यास विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभागी होवून पाठींबा दर्शविला. यावेळी बोलताना बचाव समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध नसून हा आराखडा मंदिर परिसरात करू नये अशी मागणी असल्याचे सांगितले.

यापूर्वी या परिसरात तीनवेळा विकासकामांसाठी व रूंदीकरणासाठी स्थानिकांची घरे ताब्यात घेण्यात आली आहेत. नव्या कॉरिडॉरमध्ये देखील अनेक प्राचीन मठ, मंदिरे, मठ बाधित होणार आहेत. संत नामदेव महाराज यांचे जन्म ठिकाण, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांचा मठ, अंमळनेरकर महाराज यांचा मठ आदी महत्वाची ठिकाणे बाधित होणार आहेत. यामुळे पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेचे वाळवंट, ६५ एकर परिसर अथवा नदीवर मोठा पूल उभारून करावा अशी मागणी केली.

तर आदित्य ङ्गत्तेपूरकर यांनी, कॉरिडॉर बाबत चर्चा सुरू असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याचे वेगाने काम सुरू असल्याने आमचा विश्‍वासघात केला जात असल्याचा आरोप केला. आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा समावेश कर्नाटकात राज्यात केला जावा अशी आम्ही मागणी करू असा इशारा दिला. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा कानडा ओ विठ्ठलु कर्नाटकु असा अभंग आहे. यामुळे विठुराया मुळचा कर्नाटकातील असून त्याचे हे गाव कर्नाटकात समाविष्ठ करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षी आषाढीस कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी तहसीदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून निवेदन स्वीकारले. तसेच आंदोलकांच्या भावना सरकार पर्यंत पोहचविण्याचे आश्‍वासन दिले.

या आंदोलनात बचाव समितीचे ऋषिकेश उत्पात, शैलेश बडवे, भागवत बडवे, कौस्तुभ गुंडेवार,बालाजी महाजन, डॉ.प्राजक्ता बेणारे, राजेंद्र वट्टमवार, गणेश लंके, श्रीकांत हरिदास, गणेश महाजन यांच्यासह युवक नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सतीश मुळे, माजी नगरसेवक इब्राहीम बोहरी, अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, राजू सर्वगोड, विवेक परदेशी, रा.पां.कटेकर, मनसेचे संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, राहुल परचंडे, किशोर खंडागळे, हरि गोमासे आदी सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close