राजकिय

राज ठाकरेंची तोफ दुपारी एक वाजता मंगळवेढ्यात धडाडणार सभेच्या वेळेत झाला बदल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ नोव्हेंबरला मंगळवेढा येथे दुपारी एक वाजता होणार जाहीर सभा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

राज ठाकरेंची तोफ दुपारी एक वाजता मंगळवेढ्यात धडाडणार सभेच्या वेळेत झाला बदल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ नोव्हेंबरला मंगळवेढा येथे दुपारी एक वाजता होणार जाहीर सभा

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मनसेचे नेते राज ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती सभेचे आयोजक मनसे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मंगळवेढा येथे येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यानी प्रचारात आघाडी घेतली असून महाराष्ट्रात सर्वात अगोदर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यांनी प्रचाराचा धडाका चालवला असून आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत असून त्यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावातील सभांना त्यांच्या प्रचंड गर्दी होत असून विविध पक्षाचे, गटाचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील वातावरण मनसेमय झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसतात.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व प्रश्न मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे जनतेसमोर मांडत असून जनता ही त्यांच्या अडचणी वर चर्चा करत आहे. मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे हे गेले दीड महिना झाले प्रचार करत असून त्यांची एक फेरी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराला सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यातच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवाराची सभा घेत असून मंगळवेढा येथे ते आहेत.

राज ठाकरे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस अमित ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यावेळी पासून मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये सुरू झाली असून मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी बेरजेचे राजकारण करत प्रचाराला सुरुवात सुरुवात केली आहे.

उमेदवारी अर्ज भरताना हून्नूर येथील श्री बिरोबा, हुलजंती येथील महालिंगराया, मंगळवेढा येथे श्री संत दामाजी, संत संत चोखामेळा पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पंढरपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज भरला होता. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक प्रश्नांना दिलीप धोत्रे यांनी वाचा फोडली असून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे येत असून राज ठाकरे यांच्या सभेची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. यासभेला हजारोची संख्येने नागरिक उपस्थित राहीतील राज ठाकरे नेमके मतदार संघाबाबत कोणती भूमिका घेणार आणि राज्यातील कोणत्या प्रश्नावर बोलणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close