पंढरीच्या माघ यात्रेवर विशेष पोलीसांची राहणार नजर-पो.महानिरीक्षक सुनील फुलारी
माघ यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्त
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीच्या माघ यात्रेवर विशेष पोलीसांची राहणार नजर- सुनील फुलारी
माघ यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्त
पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये वर्षाकाठी चार यात्रा भरतात यापैकी सध्या सुरू असलेल्या माघ यात्रेवर गर्दीमध्ये “हाथ की सफाई” दाखवणाऱ्या चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, नदी पात्रात व वाळवंटामध्ये भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर राहणार असल्याची माहिती आज विषेश पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
पंढरपूर येथे माघ वारी संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम सह पोलीस अधिकाऱ्यांनी पंढरपूर येथील पोलिस संकुल येथे माघ यात्रा संदर्भात विषेश पोलीस बंदोबस्त आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी शहरात होणारी भाविकांची गर्दी,वाहतूक व्यवस्था, यात्रा कालावधीत होणारे अतिक्रमण,चोऱ्या, वाटमारी व ईतर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना,विषेश पोलीस बंदोबस्त,गस्त पथक आदी बाबत माहिती दिली.
याचप्रमाणे सध्या गुळगुळीत रस्त्यांमुळे होणारे दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात,वन्यप्राण्यांचे अपघात, जिल्ह्यात तसेच पंढरपूर तालक्यातील अवैद्द वाळू तस्करी याविषयी माहिती घेतली. याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे,तसेच माघ यात्रा बंदोबस्तासाठी आलेले पोलिस अधिकारी उपस्थित होते.