क्राइम

धक्कादायक पंढरीत प्रेमातून आईवर हल्ला करत तरूणीला‌ नेले पळवून

पंढरपूर नजीक घडली घटना;पालक वर्गातून भीतीचे वातावरण

संपादक-दिनेश खंडेलवाल

धक्कादायक—पंढरीत प्रेमातून
आईवर हल्ला करत तरूणीला‌ नेले पळवून

पंढरपूर नजीक घडली घटना;पालक वर्गातून भीतीचे वातावरण

पंढरपूर : पंढरपूर शहराच्या नजीक बायपास जवळ एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने मुलीच्या आईवर हल्ला करत मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली दरम्यान या घटनेमुळे पालक वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आरोपीच्या शोधावर तालुका पोलीस निरीक्षकांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आज दुपारी पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या टाकळी बायपास रोड लगत एक महिला आपल्या २१ वर्षीय तरूण मुलीला परीक्षेसाठी नजीकच्या महाविद्यालयात मोटारसायकल वरून घेऊन जात असताना देगाव येथे राहणारा संशयित आरोपी सागर घाडगे याने आपल्या साथीदारासह तरूण मुलीस आणि तीच्या आईला रस्त्यावर आडवून शिवीगाळ करत हातातील धारदार शस्त्राने वार‌ केले. यामध्ये मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान आरोपीने संबंधित तरूण मुलीला पळवून नेले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी देखील आरोपीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार पोलीसात दाखल आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तालुका पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रवाना केली आहेत.

पंढरपूर शहरात सध्या माघ यात्रेची गर्दी आहे. अशा वातावरणात शहराच्या बायपास रस्त्यावर महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने मुलींच्या पालक वर्गांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना घडत असल्याने पोलिसांची भीतीही आरोपीवर राहिली नसल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close