
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत महसूल कडून अनधिकृत वाळू उपसा करताना धाड
अनधिकृत वाळू उपसा करणारा जेसीबी केला जप्त
पंढरपूर : पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून अशा ठिकाणी नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तहसीलदार तुषार शिंदे यांच्या पथकाने अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी धाड टाकून अनधिकृत वाळू उपसा करताना मिळवून आलेला जेसीबी कारवाईत जप्त केला. या घटनेने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर शहर व भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करून अनधिकृतपणे त्याची वाहतूक आणि विक्री केली जाते. या घटनेची माहिती मिळताच नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सहाय्यक तहसीलदार तुषार शिंदे यांच्या सह एक पथक तयार केले व या पथकाने पहाटे चारच्या सुमारास भीमा नदी पात्रा जवळ असलेल्या इसबावी,जॅकवेल येथील श्रीनाथ पॅलेस परिसरात धाड टाकून अवैधरित्या वाळू उपसा करून अनाधिकृतरित्या वाहतूक करण्यासाठी काही जण जमले होते. परंतु महसूलची धाड पडताच उपस्थित सर्वजण सैरभैर पळू लागले. यावेळी कारवाईच्या ठिकाणी एक जेसीबी मिळवून आला तो जेसीबी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.
या कारवाईमध्ये मंडल अधिकारी दिनेश भडंगे, तलाठी श्रीकांत कदम, तलाठी कौलगे ,तलाठी समीर पटेल, कोतवाल अनिल सोनवणे, कोतवाल प्रदीप घोडके, आदींनी सहभाग घेतला होता.
चंद्रभागेच्या पात्रातून गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे वाळू उपसा करून त्याची अनधिकृतपणे वाहतूक आणि विक्री होत आहे. परंतु या प्रकारावर आळा बसावा यासाठी नव्याने रुजू झालेले तहसीलदार सचिन लंगुटे यांनी कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. शहरात ज्या ठिकाणी अशा प्रकारे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.