क्राइम

पंढरपूर पोलिसांची मोठी कामगिरी;पश्चिम महाराष्ट्रात 80 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीकडून २३ मोटरसायकली जप्त

सोलापूर,पुणे,सातारा जिल्ह्यातून चोरल्या होत्या मोटरसायकली;११ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करुन त्यांचेकडुन ११ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या एकूण 23 मोटार सायकली जप्त करत मोठी कामगिरी केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना त्यांचे पथकास बातमी मिळाली की एक इसम हा त्याचे ताब्यातील चोरीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल ही के.बी.पी चौकात विक्री करण्यास आला असून तो सदर मोटार सायकल विक्रीकरीता गि-हाईक शोधत आहे. त्यामुळे तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदुम, सहा.पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
व त्याच्याकडे चौकशी सुरू केली असता सदर इसमाने आपण मांडवे,ता.खटाव, जि. सातारा येथील असल्याचे सांगितले. त्यास पंढरपूर येथे येण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकली बाबत चौकशी केली असता सदरची मोटार सायकल विरकरवाडी, ता.माण, जि.सातारा येथील असून ती चोरलेली आहे अशी खात्री झाल्याने व ती पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ७१३/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील चोरीस गेलेली असल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासाकामी अटक केली.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगितले की त्याचा मित्र मौजे वाठार बु ,ता. कोरेगाव, जि.सातारा सध्या रा. ४४० सदर बझार, सातारा, जि.सातारा येथील व दुरकरवाडी, ता. पुरंदर, जि.पुणे सध्या रा.मेडद, ता.माळशिरस या दोघांनी चोरी करुन सदरची मोटारसायकल त्यास नाममात्र ४ हजार रुपये किंमतीला विकली होती. तसेच त्यांचेकडून आणखीन चोरीच्या मोटार सायकल त्यास विकल्या असून त्या त्याने त्याचे घराजवळ ठेवल्या आहेत असे सांगितल्याने त्याचे कडून एकूण ४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

नंतर सदर वाठार बु ,ता. कोरेगाव,जि. सातारा सध्या रा. ४४० सदर बझार, सातारा,जि. सातारा येथील आरोपीस अटक करुन त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली बाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली असता चौकशी अंती सदर त्याने दोन मोटार सायकली हया त्याचे ओळखीच्या इसमाजवळ ठेवल्या असल्याचे सांगितल्याने त्याचे कडून २ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.

दुरकरवाडी,ता.पुरंदर, जि.पुणे सध्या रा.मेडद, ता.माळशिरस येथील इसमास ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयाच्या तपासकामी अटक करुन त्याच्याकडेही चोरीच्या मोटार सायकलीबाबत तपास केला असता त्याने त्याचे ओळखीच्या मित्राकडे एकूण १६ मोटारसायकली ठेवल्या असल्याचे सांगितल्याने त्याही सदर गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आल्या आहे.

सदर गुन्हयातील वाठार बु , ता.कोरेगाव,जि. सातारा सध्या रा. ४४० सदर बझार, सातारा, जि. सातारा येथील अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी व मोटारसायकल चोरी या सदराखाली पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्हयात जवळपास ८० गुन्हे दाखल आहेत.

सदर गुन्हयातील जप्त मोटार सायकली हया पंढरपूर शहर,म्हसवड, विटा, भिगवण,दिघी, बारामती, चिंचवड, हडपसर, लोणी काळभोर, अलंकार, वार्जे, सासवड या पोलीस ठाणे हद्दीतील असून ६ मोटार सायकलीबाबत माहिती काढण्याचे काम चालु आहे.

सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अपर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर विभाग,पंढरपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि.राजेंद्र मगदुम, स.पो.फौ. राजेश गोसावी, पो.हे.कॉ.शरद कदम, पो.हे.कॉ. बिपीनचंद्र ढेरे, पो.हे.कॉ. सुरज हेंबाडे, पो.हे.कॉ. इरफान मुलाणी, पो.ना. इरपान शेख, पो.ना. शोएब पठाण, पो.ना. महेश पवार,पो.ना. सुनिल बनसोडे,पो.ना. सुजित जाधव,पो.कॉ.समाधान माने,पो.कॉ.विनोद पाटील, पो.कॉ.अर्जून केवळे,पो.कॉ.अन्वर आतार (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस नाईक महेश पवार हे करीत आहेत.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close