पंढरपुर गुन्हे शाखेने सोन्याचे दागिने, मोटारसायकल,मोबाईल चोरी चे गुन्हे केले उघड
५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,२ मो.सायकल,५ मोबाईल असा २ लाख ६० हजार रू किमंतीचा मुद्देमाल केला जप्त
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपुर गुन्हे शाखेने सोन्याचे दागिने, मोटारसायकल,मोबाईल चोरी चे गुन्हे केले उघड
५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,२ मो.सायकल,५ मोबाईल असा २ लाख ६० हजार रू किमंतीचा मुद्देमाल केला जप्त
पंढरपूर : महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी असते. अशाच गर्दीचा फायदा चोरांकडून घेतला जातो आणि भाविकांच्या खिशातील मोबाईल देवदर्शनसाठी गेलेल्या भाविकांचे मोटरसायकल त्याचबरोबर एसटी बस मध्ये चढणाऱ्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकाकडून अटक करून विविध गुन्ह्यातील मोठी कारवाई उघड करत मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे भादवि कलम ३९२ चा एक,व कलम ३७९ चे ४ प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असुन पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे वरील सर्व गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी करत चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीतांकडून जप्त केला आहे.
पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकांनी कलम ३९२ नुसार दाखल सदर गुन्हयामध्ये वाशिम येथील भाविक फिर्यादी लक्ष्मण कोल्हे हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आले असता व ते दर्शन घेवुन परत गावी जाणेकरीता एस.टी. बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे गळयातील रु.९०,०००/- किंमतीचा २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप आरोपीने जबरीने चोरून नेला होता. या घटनेतील वर्णनाचा सोन्याचा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयामधील फिर्यादी महिला नागबाई प्रभु गोगाव रा. पंढरपुर या जुने बस स्टैंड येथे बसमध्ये चढत असताना त्यांचे
रु.५०,०००/- किंमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र चोरटयाने चोरून नेले होते. सदर नमुद वर्णनाचा मुद्देमाल आरोपीताकडुन जप्त करणेत आलेला आहे.
तर याच कलमातील दुसऱ्या
गुन्हयामध्ये फिर्यादी महिला वैशाली कैलास तोडकरी रा. मोडनिंब ता. माढा जि.सोलापुर या बस स्टैंड येथे बसमध्ये चढत असताना रु ७०,०००/- किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरटयाने चोरून नेले होते. सदर नमुद वर्णनाचा मुद्देमाल आरोपीताकडुन जप्त करणेत आलेला आहे.
तीसर्या गुन्हयामधील फिर्यादी हे पंढरपूर येथे देवदर्शनाकरीता आले असताना त्यांचेमालकीची रु. ३०,०००/- किंमतीची एक लमर कंपनीची मोटार सायकल चोरीस गेली होती. सदरची मोटारसायकल गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन जप्त करणेत आलेली आहे.
चौथ्या गुन्हयामधील फिर्यादी उध्दव शिंदे रा. निफाड जि. नाशिक हे पंढरपूर येथे कार्तिकवारी करीता आले असताना त्यांचे मालकीची रु.२०,०००/- किंमतीची एक होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल पंढरपूर येथील रेल्वे मैदान येथुन चोरीस गेली होती.
सदरची मोटारसायकल गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन जप्त करणेत आली आहे.
वरील ०५ गुन्हयामध्ये ०२ आरोपीतांकडुन एकुण २ मोटारसायकली
तसेच एकुण ५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा २ लाख ६० हजार रू किमंतीचा चोरी गेलेला मुद्देमाल उघडकीस आणुन जप्त करणेत आलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम,पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर अरूण फुगे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि चिमनानी केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफी नागेश कदम, राजेश गोसावी, पोहवा शरद कदम, सुरज हॅबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनिल बनसोडे, सचिन बाडे, दादा माने, राकेश लोहार, शहानी मंडले व सायबर सेलचे पोकॉ अन्दर आतार यांनी केली आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.