क्राइम

पंढरपूर पोलिसांनी २ लाख१६ हजार ५०० रू किंमतीचे ३५ मोबाईल हँडसेट सह आरोपीला केली अटक

पंढरपुर शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर पोलिसांनी २ लाख१६ हजार ५०० रू किंमतीचे ३५ मोबाईल हँडसेट सह आरोपीला केली अटक

पंढरपुर शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

पंढरपूर : पंढरपूर शहरात कार्तिक वारीमध्ये येणा-या परजिल्हयातील वारकरी भाविकांचे मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरीस गेले होते. भाविकांनी अशा मोबाईल बाबत पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामधील काही तक्रारीचा तपास करताना शहर पोलिसांनी पंढरपूर येथील ३२ खोल्यांमध्ये राहणाऱ्या आरोपीला ३५ मोबाईल सह ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली. या जप्त केलेल्या मोबाईलची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत २ लाख १६ हजार ५०० रुपये आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पंढरपूर शहरांमध्ये कार्तिक यात्रेदरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल चोरी झाली होती. या गुन्हयामध्ये ०७ मोबाईल हँडसेट चोरी केल्याचा गुरनं ८६६ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीकडुन २,१६,५००/- रू किमतीचे चोरी केलेले एकुण ३५ मोबाईल हँडसेट तपासात जप्त करणेत आलेले आहेत.

 

या मध्ये आरोपी आतिष उर्फ महादेव हणमंत सगर (वय २२) वर्षे धंदा- मजुरी रा. ३२ खोल्या संतपेठ पंढरपूर याने सोलापुर जिल्हयातील व कर्नाटक राज्यातील भाविकांचे मोबाईलची चोरी केली असुन ते सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आले.

चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा उघडकीस आणुन चोरीस गेलेले मोबाइल जप्त करणेत आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगीरी ही ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम,व शहर पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि चिमणाजी केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ नागेश कदम, राजेश गोसावी, पोहवा शरद कदम, पोहवा सुरज हेंबाडे, पोहवा ढेरे, पोना सचिन इंगळे, पोना सुनिल बनसोडे, पोना सचिन बाडे, पोना दादा माने, पोना राकेश लोहार, पोकॉ शहाजी मंडले व सायबर सेलचे पोकाॅ अन्वर आतार यांनी केली आहे. पंढरपूर गुन्हे प्रगटिकरण शाखेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close