ईतर

सोलापूर जिल्हा पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचारा विरोधात आरपीआय (आठवले) आझाद मैदानात आंदोलन

पुनर्वसन मंत्र्यांच्या बैठकीत ठोस निर्णय नसल्याने आंदोलन सुरू

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

मुंबई : सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा बाबत आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांचे खाजगी सचिव आनंद रामटेके यांच्या सोबत बैठक पार पडली. मात्र ठोस कारवाई होत नसल्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणारे आर पी आय चे प्रदेश संगठ्न सचिव दिपक चंदनशिवे यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोलापूर पुनर्वसन विभागात प्रकल्प ग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकरणांमुळे तत्कालीन पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तातून नाराजी व्यक्त केली जात होती.

सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,मंगळवेढा माळशिरस,माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचा शोध घेऊन सदर व्यवहारात मिलीभगत करून कमी किमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे. यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी,विक्री व्यवहारही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत. काही प्रकल्पग्रस्तांच्या एकाच आदेशावर दोन-दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला आहे.

आशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आरपीआयचे दिपक चंदनशिवे यांनी केली होती.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना प्रकरणनिहाय सखोल चौकशी करून १५ दिवसात स्पष्ट अहवाल सादर करावा असे आदेश २८ सप्टेंबर २०२१ रोजी दिला होता. परंतु यावर कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आरपीआय च्या वतीने पंढरपूर तहसीलसमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन करण्यात आले होते.

प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे प्रकल्प बधितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आझाद मैदानात आंदोलनं करत आहोत. आणि जोवर न्याय होत नाही तो पर्यंत आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार दिपक चंदनशिवे यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनात सुरेश नवले, नितीन काळे, संतोष ननवरे, विजयकुमार खरे, दत्ता वाघमारे,पिंटू कांबळे, भास्कर चंदनशिवे, अनिल चंदनशिवे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, परशुराम शिंदे, महादेव सोनवणे, सय्यद पठाण, सौ.अविंदा गायकवाड, रवी भोसले, अनिल काळे, नाथा बाबर, सुजित सोनवणे,परसू शिंदे, संजय भोसले, शाहू शिंदे, कलीम पठाण आदी उपस्थित आहेत.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close