सामाजिक

पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून केला कायापालट

स्वच्छ हवा,पाणी, रंगरंगोटी देवतांची चित्रे, तुळशी कुंडी, फर्निचर सह विविध सुविधा

संपादक-दिनेश खंडेलवाल

तहसीलदारांचा उपक्रम पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून केला कायापालट

स्वच्छ हवा,पाणी, रंगरंगोटी देवतांची चित्रे, तुळशी कुंडी, फर्निचर सह विविध सुविधा

पंढरपूर : पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पंढरपूर सबजेलची स्वच्छता व रंगरगोंटी तसेच कैद्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्थेसह आदी आवश्यक कामे लोकसहभातून केली असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी दिली.

पंढरपूर सबजेलमध्ये 7 कारागृह कोठड्या व दोन व्हरांडे आहेत. या ठिकाणच्या आतील व बाहेरील भिंतींना रंगरंगोटी, दरवाजांना रंग,जुन्या लाकडी फर्निचरमधून नवीन खुर्च्या व बाकडे तयार करण्यात आली. तसेच कोठडीतील आरोपीना स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोठडीत कैद्यांना सकारात्मक उर्जा मिळावी त्यांच्या आचरणात बदल व्हावा यासाठी समोरील भिंतीवर देवदेवतांचे भिंती चित्र तसेच स्वच्छ हवा मिळावी यासाठी तुळशी कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पावसामुळे दिवसांत कोठडीच्या भिंती ओल्या झाल्यावर विद्युत प्रवाह भिंतीत उतरण्याची श्यकता असल्यामुळे जुन्या झालेले विद्युत उपकरणे बदलून त्याठिकाणी नविन विद्युत उपकरणे टाकण्यात आली. असेही नायब तहसिलदार श्री. श्रोत्री यांनी सांगितले.

सदरचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.

या कामासाठी सहा.पोलीस उप निरिक्षक श्री. खांडेकर,पो. कॉ. श्री गुटाळ तसेच तहसिल कार्यालयाचे जेलर सुभाष परळकर,भारत सुरवसे, भागवत बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close