पंढरपूर तालुक्यात फिरते लोक अदालत -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे
'न्याय आपल्या दारी’ उपक्रमातंर्गत नागरिकांना मिळणार न्याय
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : ग्रामीण भागातील जनसामान्यांना तसेच समाजातील तळागाळातील नागरिकांना न्याय मिळावा. याकरिता मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्या आदेशान्वये पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यात ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतंर्गत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोक अदालत गावागावांत पोहोचणार असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी दिली.
‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतंर्गत फिरते लोकअदालतीसाठी महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई, येथून आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल, न्यायाधीश एम. आर. जाधव, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश श्रीमती टी. जी. बन्सोड, न्यायाधीश एम. आर. कामत, न्यायाधीश श्रीमती आर. जी. कुंभार, न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे उपस्थित होते.
सदर फिरते लोक आदालत हे दि. ३० सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत तालुक्यातील भाळवणी,करकंब व तुंगत येथील ग्रामपंचायत येथे जावून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅकांचे,विद्युत महामंडळाचे, इतर दाखलपुर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात येणार असल्याचेही जिल्हा न्यायाधीश श्री.लंबे यांनी सांगितले.
संबधित ग्रामपंचायतीतील जास्ती-जास्त नागरिकांना या फिरत्या लोकअदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी यावेळी केले आहे.पंढरपूर : ग्रामीण भागातील जनसामान्यांना तसेच समाजातील तळागाळातील नागरिकांना न्याय मिळावा. याकरिता मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्या आदेशान्वये पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यात ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतंर्गत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोक अदालत गावागावांत पोहोचणार असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी दिली.
‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतंर्गत फिरते लोकअदालतीसाठी महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई, येथून आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल, न्यायाधीश एम. आर. जाधव, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश श्रीमती टी. जी. बन्सोड, न्यायाधीश एम. आर. कामत, न्यायाधीश श्रीमती आर. जी. कुंभार, न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे उपस्थित होते.
सदर फिरते लोक आदालत हे दि. ३० सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत तालुक्यातील भाळवणी,करकंब व तुंगत येथील ग्रामपंचायत येथे जावून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅकांचे,विद्युत महामंडळाचे, इतर दाखलपुर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात येणार असल्याचेही जिल्हा न्यायाधीश श्री.लंबे यांनी सांगितले.
संबधित ग्रामपंचायतीतील जास्ती-जास्त नागरिकांना या फिरत्या लोकअदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी यावेळी केले आहे.
यावेळी पॅनल विधीज्ञ अॅड. व्ही. एम. सरवळे, अॅड. एस. ए. गोसावी, विधी स्वयंसेवक आझाद अल्लापूरकर, मथुरादास देशपांडे, अॅड. वाघमोडे, आर. एस. बेंबळकर, अधिक्षक व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.