विरोधकाच्या भावनिकतेला व भूलथापांना बळी न पडता मतदार संघाच्या विकासासाठी समाधान आवताडे यांना मतदान करा- परिचारक
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे जनतेला आवाहन
संपादक – दिनेश खंडेलवाल
विरोधकाच्या भावनिकतेला व भूलथापांना बळी न पडता मतदार संघाच्या विकासासाठी समाधान आवताडे यांना मतदान करा- परिचारक
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे जनतेला आवाहन
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी ही निवडणूक असून नागरिकांनी भावणीकतेवर मतदान न करता विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
प्रशांत परिचारक पुढे बोलताना म्हणाले की, केंद्रामध्ये आपल्या विचाराचे सरकार आहे राज्यामध्येही आपले विचाराचे सरकार येणार आहे. अशा वेळेस आपल्या मतदारसंघातील आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणी असे महत्त्वाचे मुलभूत प्रकल्प सुरू आहे. त्या प्रकल्पाला भरीव मदत मिळणे गरजेचे आहे.
उद्याच्या २० तारखेला समाधान आवताडे यांना मतदान केले तर या निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारकडून आपल्या मतदारसंघाला भरीव निधी मिळणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक अपप्रचार केले जात आहेत, आशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण उद्याच्या २० तारखेला कमळ या चिन्हा समोरचे बटन दाबून आपण समाधान आवताडे यांना निवडून द्यावे असे आवाहन यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे.