मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळवून देतो म्हणत २५ वर्षीय अभिनेत्रीवर पुण्यात बलात्कार;ब्ल्यू फिल्म बनवण्याची धमकी देऊन मागितली खंडणी
वारजे पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पुणे : पुणे तिथे काय उणे या म्हणीप्रमाणे पुण्यामध्ये एका २५ वर्षीय मराठी चित्रपटातील अभिनेत्री ला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळवून देतो म्हणत २०१७ साली जवळीक साधून आरोपीने पीडित अभिनेत्रीशी मैत्री केली व तिला आपल्या जाळ्यात अडकवले यानंतर तिला खोटी आश्वासने देत तिच्याकडून सुमारे ६ लाख ४१ हजार रुपये उकळले व तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अजून दहा लाख रुपये मागितल्याने अखेर पीडित अभिनेत्रीने पोलिसात धाव घेतली.
दरम्यान एवढ्यावरचं हे प्रकरण थांबलं नाही तर आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचं ही पीडित अभिनेत्रीने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश माल्ल्या, अभिजित गणपत साठे आणि त्याची औंध येथील बहीण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी राजेश याची मुंबईत मेमर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंट नावाची कंपनी असून ही कंपनी चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटींगचे साहित्य भाड्याने द्यायचं काम करते. यामुळे अनेक दिग्दर्शकांशी आरोपींची ओळख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै २०१७ च्या दरम्यान अभिजीत गणपत साठे, राजेश माल्या, तसेच एका महिलेसोबत २५ वर्षीय पीडित तरुणीची ओळख झाली.
त्यावेळी पीडित तरुणी आणि आरोपी अभिजीत गणपत साठे हे दोघे संपर्कात आले. यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मी तुला मोठ्या बॅनरचा चित्रपट मिळवून देतो आपण फोटोशूट कंपनी काढू असं आमिष दाखवत आरोपीने पीडित अभिनेत्रीकडून ६ लाख ४१ हजार रुपये उकळले.
यादरम्यान आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचंही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर आरोपी अभिजीतने पीडितेने ब्ल्यू फिल्म तयार करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची मागणी केली. यात आरोपीला राजेश माल्या आणि आणखी एका महिलेने साथ दिली.
दरम्यान सततच्या त्रासाला कंटाळून अखेरीस या अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच पुण्यातील एका महिला वकीलाने हे प्रकरण मिटवण्यासाठी जबरदस्तीने नोटरी करून घेतल्याचा आरोपही पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत केला आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com