पंढरीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात
पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले;चौकशी मध्ये येणार त्या अधिकार्याचे नाव बाहेर!
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाच मागण्याच्या प्रकारात वाढ होत असतानाच आज पंढरपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारा कर्मचारी ठरलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला सदर प्रकार घडताच सार्वजनिक बांधकाम खात्यात एकच खळबळ उडाली
पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याची जमीनी पासुन रस्ता गेला असल्याने त्या जमीनीची वाणिज्य व्यवसाय प्रयोजनासाठी बिगरशेती (एन ए)करण्याकरीता जमिनीचे नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून १३ जून २०२२ रोजी अर्ज दिला होता.
सदर अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित शेतकरी ऑफिसमध्ये गेला असता तेथे कारकून या पदावर नेमणूक असलेले चंद्रकांत अभिमन्यू टोनपे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी वरिष्ठांच्या नावे सदर कर्मचाऱ्याने एकूण ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यातील दहा हजार स्वतः करीता व २० हजार रुपये वरिष्ठांना देणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान शेतकऱ्याने ठरल्याप्रमाणे ला देण्यासाठी पंढरपूर येथील नवीन कराड नाका येथे असलेल्या ठाकरे चौकात लाच देण्यासाठी थांबला होता याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सोलापूर यांच्या तिने सापळा रचला होता या सापळ्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचारी चंद्रकांत अभिमन्यू टोणपे हा अडकला
तो वरिष्ठ अधिकारी कोण?
यालाच प्रकरणात संबंधित र्मचार्याने वरिष्ठांच्या नावाने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती तो वरिष्ठ अधिकारी कोण याकडे आता पंढरपूर सह बांधकाम खात्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे मात्र लाच घेताना अटक केलेला कर्मचारी चंद्रकांत टोणपे यांच्या चौकशी दरम्यान संबंधित अधिकार्याचे नाव उघड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांनी १०६४ या क्रमांकावर कॉल करावे
सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात येत आहे की ज्या सरकारी कार्यालयांमध्ये अथवा त्या कार्यालयातील एजंटमार्फत जर कोणी लाच मागत असेल तर त्याची माहिती १०६४ या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी जेणेकरून संबंधित लाच मागणाऱ्यांस अटक करून कारवाई करणे सोपे होणार आहे तसेच लाच मागण्याच्या प्रकारावर हि आळा बसणार आहे.