देवडीचे सरपंच यांचा राजाभाऊ खरे यांच्या गटात प्रवेश
संपादक-दिनेश खंडेलवाल
देवडीचे सरपंच यांचा राजाभाऊ खरे यांच्या गटात प्रवेश
उद्योजक राजाभाऊ खरे यांचे गोपाळपूर येथील फार्महाऊसवर घेतला प्रवेश
पंढरपूर/दिनेश खंडेलवाल:- मोहोळ विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी आत्तापासूनच सुरू झाल्याचे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मोहोळ मतदार संघातील विविध गावातून, कार्यकर्त्यांचे घोळके उद्योजक तथा भावी आमदार राजाभाऊ खरे यांच्या गोपाळपूर येथील फार्महाऊस वर येऊन आपल्या भागातील समस्या सांगून त्या सोडवून घेतना दिसत आहेत. या मतदारसंघात सरकारी निधीतून विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतानाच राजाभाऊ खरे यांनी पदरमोड करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यामुळे अनेकांनी आपला पाठिंबा राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगत यांच्या गटात सामील होत असल्याचे जाहीर करत आहेत. दरम्यान आज देवडी गावचे विद्यमान सरपंच सागर थोरात यांचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या गटात आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला आहे.
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघातून आपली उमेदवारी खरे यांनी निश्चित असल्याचे जाहीर केल्यामुळे पंढरपूरचे सुपुत्र राजाभाऊ खरे यांच्या गोपाळपूर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची शनिवारी आणि रविवारी मोठी गर्दी वाढत असल्याचे चित्र मागील अनेक महिन्यापासून दिसत आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून राजाभाऊ खरे यांनी प्राधान्य दिले होते. त्यांच्या समाजकार्याची प्रचिती म्हणून अनेक गावातील पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच राजाभाऊ खरे यांच्याशी सलगी करत गाठीभेटी सुरू केल्याचेही दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता वेध लागले आहेत आगामी विधानसभेच्या रणधुमाळी चे त्यादृष्टीने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु उद्योजक राजाभाऊ खरे यांचे नाव अवघ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील घराघरात पोहोचले आहे. यामुळे खरे यांचा गट प्रबळ होत असल्याचे दिसून येत आहे.
मोहोळ मतदार संघातील अनेक गावातील शाळा महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांना बॅंचेस, शैक्षणिक साहित्य तसेच अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू भेट दिल्या आहेत. नुकतीच उन्हाळ्यातील वाढलेली दाहकता आणि पारा पाहता अनेकांच्या बोअरवेल मधील पाणी संपल्याने बोअर कोरड्या पडल्या होत्या. प्रशासनही पोहचू शकत नाही अशा ठिकाणी राजाभाऊ खरे यांनी आपल्या मार्फत सुरू केलेल्या मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणी पोहोच करून नागरिकांची पाण्यासाठी होणारी वनवन थांबवली अन् तहान भागवली. या मतदारसंघातील नागरिकांनी आम्हाला आता पाणी नको असे सांगितल्यानंतरच टँकर बंद करण्यात आले. परंतु बंद करताना या भागातील नागरिकांना पाहिजे तेव्हा पाणी मिळेल तसेच कोणतीही अडचण असल्यास येऊन भेटा असे आश्वासन राजाभाऊ खरे यांनी दिले होते. त्यामुळे त्यांना कलयुगातील भगीरथ ही म्हटले जाऊ लागले आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे ही सामाजिक बांधिलकी ठेवत प्रत्येकाला समाधान देण्याचे काम सध्या गोपाळपूर येथील राजाभाऊ खरे यांच्या शेडमध्ये होत असल्याचे पहावयास मिळत आहे.