राजकियराज्य

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

वरिष्ठांच्या निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष कोणाचे भाग्य चमकणार!!

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

वरिष्ठांच्या निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष कोणाचे भाग्य चमकणार!!

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर चे नगराध्यक्ष पद हे महिला ओपन असल्याने प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तयारीत आहे. आज भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा पक्षाचे नेते अनिल दादा सावंत यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या यामध्ये एकूण ४७ जणांनी मुलाखती दिल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंढरपूर नगरपालिका निवडणूक २०२५ साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे घेण्यात आल्या. यामध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी शरद पवार गटाकडून सौ. दिपालीताई संतोष नेहतराव व सौ. कावेरीताई शाम गोगाव या महिला उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून नगरसेवक पदासाठी पुरुष व महिला दोन्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

यामध्ये नगरसेवक पदासाठी ४५ तर नगराध्यक्ष पदासाठी २ अशा एकूण ४७ जणांच्या मुलाखती पार पडल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे आता कार्यकर्त्यांसह पंढरपूर वाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.

नगराध्यक्ष पदाला इच्छुक असलेल्या सौ. दिपाली संतोष नेहतराव यांनी यापूर्वीही पंढरपूर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली व त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा पंढरपूर शहराचे व्हिजन घेऊन नगराध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे त्यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे.

पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दुसऱ्या इच्छुक उमेदवार सौ. कावेरी शाम गोगाव यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंढरपुरातील नेते अनिल दादा सावंत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये अनेक जण इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याबाबत निर्णय आल्यास व तसा आदेश वरिष्ठांनी दिला तर स्वतंत्र नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी पॅनल उभा करण्याचीही त्यांची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close