रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी: धान्य घेण्यासाठी लागणार जात प्रमाणपत्र;शिधापत्रिका धारकांना जात प्रमाणपत्राची लावलेली अट रद्द करावी
अशासकीय सदस्य नंदकुमार देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत केली मागणी

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेताना रेशन कार्डधारकांना आता जात प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. अशा आशयाच्या सूचना लवकरच लागू होणार असून या सुचना अन्यायकारक असल्याने त्या रद्द करण्याची मागणी नंदकुमार देशपांडे यांनी केली आहे.
‘धान्य’ अन्न म्हणून सर्वांनाच लागते धान्य काही हा गरीब ना श्रीमंत हा शहाणा हा वेडा असे पहात नाही. माणसाचा जठराग्नी शांत करण्यासाठी अन्नाची सर्वांनाच गरज असते. त्याच अन्नाच्या आडून शासनाने समाजामध्ये समरसता एकीकरणाच्या ऐवजी परत एकदा जातीचे पेरणी चे प्रयोग चालू केलेत हे दुर्दैव आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या शिधापत्रिका धारकास जात प्रमाणपत्र बंधनकारक आहे असे नमूद केले असून हा समाजातील वंचित घटकावर एक प्रकारे अन्याय आहे.
याकरता आपण जातीने लक्ष घालून धान्य देताना रेशन कार्ड धारकास लावलेली जातीची अट रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सदस्य नंदकुमार देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य सचिवा व जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे मॅडम व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली असून यास ग्राहक संरक्षण परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा देऊन तसा ठराव करून आपण शासनाकडे पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सेतू कार्यालयात ग्राहक संरक्षण परिषदेत मासिक आयोजित केलेल्या बैठकीत विविध प्रश्नावर ही चर्चा करण्यात आली प्रामुख्याने जात प्रमाणपत्र चा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला शिधापत्रिका धारकांना जात प्रमाणपत्राची स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेतेवेळी जातीची अट घातली आहे ती शासनाने त्वरित मागे घ्यावी. एकीकडे दृश्य अस्पृश्यता मानायची नाही. समाजात एकी समरसता याचा जागर करायचा आणि दुसरीकडे मात्र जात प्रमाणपत्राची अट घालायची ही अन्यायकारक बाब आहे ती दूर न झाल्यास समाजात दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समाजात समरसता एकता बंधुभाव हा ठेवायचा असेल तर ही अट रद्द करावी लागेल ती करावी अशी मागणी करण्यात आली तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने शिधापत्रिका धारकांना धान्य घेताना घातलेली जात प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिवा वर्षा लांडगे मॅडम यांनी आपणा सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मी आपला ठराव शासनाकडे पाठवून देत आहे असे सांगितले.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com