एसटी कर्मचाऱ्यांचे २५ रोजी विविध मागण्यांसाठी उपोषण-बाळासाहेब जाधव
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा;दिवाळी भेट १५ हजार रुपये मिळावी
संपादक-दिनेश खंडेलवाल
एसटी कर्मचाऱ्यांचे २५ रोजी विविध मागण्यांसाठी उपोषण-बाळासाहेब जाधव
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा;दिवाळी भेट १५ हजार रुपये मिळावी
पंढरपूर :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २५ ऑक्टोंबर रोजी उपोषणावर जाण्याचा निर्णय घेतला. असल्याची माहिती पंढरपूर डेपो अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिली आहे.
सेवाशक्ती संघर्ष युनियन यांच्यावतीने दिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही तर २५ ऑक्टोंबर रोजी एक दिवशीय उपोषण जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्याचा इशारा दिला होता.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने सातवा वेतन आयोगानुसार सेवा जेष्ठता प्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी,दिवाळी भेट १५ हजार द्यावी, नोकरीची व वेतनाची हमी राज्य शासनाने घ्यावी, आंदोलन काळातील पगार कर्मचाऱ्यांना द्यावे किंवा २७ ऑक्टोबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ पर्यंतचा आंदोलनाचा काळ हा विशेष बाब म्हणून वार्षिक वेतन वाढ व उपदानासाठी ग्राह्य धरावे, शिस्त व आवेदन कार्यपद्धती मधील जाचकटरी रद्द करण्यात याव्यात, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी, कोविड काळातील कोरोना भत्ता मिळावा, मागील वेतन वाढीमध्ये वार्षिक वेतन वाढीचा दर एक एप्रिल २०१६ पासून तीन टक्के वरून दोन टक्के केलेला आहे तो दोन टक्के वरून पुन्हा तीन टक्के एक एप्रिल २०१६ पासून करावे, सुमारे सहा वर्षातील एक टक्के बदल असा सहा टक्के परत द्यावे, कामगारांना एक एप्रिल २०१६ पासून जाहीर करण्यात आलेल्या वेतनवाढीच्या परिपत्रकात बदल करावे, महामंडळातील कामगारांना मिळणारे गणवेशाचे पैसे द्यावे, अथवा चांगल्या प्रतीचे खाकी कापड देण्यात यावे, लिपिक या पदाच्या पदोन्नतीसाठी २४० दिवसाची अट रद्द करावी,
शासनाने ५ हजार १५० इलेक्ट्रिक वाहने देण्यासंदर्भात निर्णय जाहीर केलेला आहे. परंतु ही वाहने शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात स्व:मालकीची द्यावी तसेच २०१८ पासून महागाई भत्ता घर भाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर व त्याचा फरक द्यावा, थकित महागाई भत्तासह विविध मागण्यासाठी एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे माहिती केंद्र उपाध्यक्ष माऊली शिंदे व पंढरपूर डेपो अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.