पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील एकही काम पुढच्या पाच वर्षात शिल्लक राहणार नाही – आ. समाधान आवताडे
येणाऱ्या काळात दोन आमदार असल्यावर या मतदारसंघाचा भौगोलिक विकास होणार
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील एकही काम पुढच्या पाच वर्षात शिल्लक राहणार नाही – आ. समाधान आवताड
येणाऱ्या काळात दोन आमदार असल्यावर या मतदारसंघाचा भौगोलिक विकास होणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती भाजप पुरस्कृत आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळाली असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव खेड्यात आणि शहरांमध्ये त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने पुन्हा एकदा आमदार समाधान आवताडे हे भरघोस मतांनी विजयी होतील यात शंका नाही. गावागावातील जनतेचा मतदारांचा नागरिकांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.
या मतदारसंघात तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या विकास कामासाठी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
यावेळी बोलताना समाधान दादा आवताडे म्हणाले की मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न असोवा रस्त्याचा प्रश्न असो या ठिकाणी मतदारसंघात अनेक वर्षापासून एमआयडीसीचा प्रश्न अपूर्ण होता तो प्रश्न मार्गी लावून येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी काम सुरू होणार आहे. या भागातील तरुण पिढी जनता रहिवासी यांना याच ठिकाणी काम देण्याचे स्वप्न त्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.
अनेक गाव खेड्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधून शेतमाल नेताना मोठी अडचण निर्माण होत होती. परंतु आता शेतापासून रस्ते निर्माण झाल्यामुळे त्यांचा माल शेतातून थेट वाहनात जात असल्याने त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. मतदार संघात सध्या विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जात आहे. त्यांच्या या खोट्या नरेटिव्हला येथील जनता बळी पडणार नाही. अनेक भागातील अपुऱ्या विद्युत पुरवठ्याच्या ठिकाणी असलेल्या तक्रारीचे निराकरण करून त्या ठिकाणी डीपी ची संख्या वाढविण्यात आली.
यासाठी कोट्यावधीचा निधी आणून विजेचा प्रश्न सोडवण्यात आला.
मतदार संघाच्या विविध गावांमध्ये भौगोलिक सुविधा देऊन गावाचा विकास करण्यात आला. पोट निवडणुकीमध्ये मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली ती संधी आता येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दिल्यास या मतदारसंघातील एकही काम शिल्लक राहणार नाही.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आपला आशीर्वाद लाभून मला निवडून दिल्यानंतर या मतदारसंघातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाही सरकार विधान परिषदेवर घेणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत दोन आमदार होणार असल्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा भौगोलिक विकास होऊन कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची ग्वाही प्रचंड संखेने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर बोलताना भाजप उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.