राजकिय

आपल्या मतदारसंघात विकासाभिमुख धोरण प्रभावीपणे राबवणार आ.समाधान आवताडे

विविध विकास कामांच्या धोरणातून झाला गावात विकास

संपादक – दिनेश खंडेलवाल 

आपल्या मतदारसंघात विकासाभिमुख धोरण प्रभावीपणे राबवणार आ.समाधान आवताडे

विविध विकास कामांच्या धोरणातून झाला गावात विकास

पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महायुती भाजपचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांच्या गाव भेट दौरे व सभा सुरू असून प्रत्येक गावात भेट दिल्यानंतर तेथील जनतेच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन तसेच विविध कामाच्या माध्यमातून गावचा झालेला विकास याबाबत संवाद साधत आहेत.

तपकिरी शेटफळ येथे समाधान दादांच्या सततच्या पाठपुराव्याने गावातील पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे व मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी तपकिरी शेटफळ या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी हितगुज करत संवाद साधला.

यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून समाधान आवताडे यांनी राबवलेल्या योजना व विविध विकास कामांच्या व धोरणांच्या माध्यमातून झालेली गावातील लोककल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडली.

आपल्या मतदारसंघात विकासाभिमुख धोरण आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी महायुतीचा विजय महत्वाचा आहे, असं स्पष्ट प्रतिपादन समाधान आवताडे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मूलभूत सुविधा गावात आणण्यात यश मिळाले आहे. पुढील काळात अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने आणखी जोमाने काम करण्यासाठी २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने समाधानदादांना पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी,सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close