सामाजिक

समृद्धी बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरित

संपादक – दिनेश खंडेलवाल 

समृद्धी बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरित

पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्रासह पंढरपूर- मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करत असलेले समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे चालू वर्ष २०२५ मधील विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. अशी माहिती समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आणि “डी पी न्यूज” मराठीचे मुख्य संपादक दत्तात्रय पांढरे यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून पुळुज येथे ३१ मे रोजी दुपारी १ वाजता मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कार वितरित करत असताना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुरस्काराचे मानकरी निवडत असताना सर्वसामावेशक विचार करून त्यांची निवड करण्यात आली.

समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचा पुरस्कार- २०२५ यांना प्रदान करण्यात आला. यंदाचा आदर्श पत्रकार दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार सुहास घोडके (दर्पणरत्न), कु. प्रियंकाताई परांडे (युवती राजरत्न), ह.भ.प. सूर्याजी भोसले (प्रेरणादायी प्रवचनकार रत्न), पूजा खपाले (युवती दर्पणरत्न), राणूबाई होनमाने (वीरमाता रत्न), विठ्ठलराव टाकळे (शिक्षक रत्न), भगवान कुलकर्णी (ग्रामसचिव रत्न), तुकाराम गायकवाड (मुख्याध्यापक रत्न), समाधान कांबळे (ग्रामसचिव रत्न), लक्ष्मण लोमटे (समाजसेवा रत्न), हल्लाप्पा सुरणवर (संत बाळूमामा सेवारत्न), धनाजी मदने (मल्लविद्यारत्न), भारत मुढे (विचारमंथन रत्न), कोमल काजळे (आरोग्य रत्न), सुनील होनमाने (१०८, आरोग्यसेवा रत्न), अमोल बाबर (द्राक्षरत्न), छाया कोरे (सेविकारत्न), सरस्वती तारके (आरोग्यरत्न), तानाजी मल्लाव (आरोग्य रत्न), नितीन जरग (१०८, आरोग्यसेवा रत्न), ऋषिकेश सावंत (ग्राफिक्स कलारत्न),दीपक सुतार, आदर्श आरोग्य कक्ष सेवक)अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आणि डी पी न्यूज मराठीचे संपादक दत्तात्रय पांढरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close