बिझनेस

सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील

दिवाळी सणासाठी कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस देणार

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील

दिवाळी सणासाठी कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस देणार

पंढरपूर(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी होमहवन पूजा सौ.शितल व महादेव उत्तम देठे (धोंडेवाडी) आणि सौ.दिपाली राहुल कांतीलाल हादगिणे (जैनवाडी) या दांपत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील बोलताना म्हणाले की सांगोला साखर कारखाना सुरू करत असताना अनेक संकटे आली परंतू त्यातून मार्ग काढत गाळप यशस्वी केले. सांगोला साखर कारखान्याचे नाव पुन्हा एकदा नावारूपाला आणण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे. सांगोला कारखान्यामुळे विठ्ठल कारखाना व विधानसभेच्या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले. कारखाना चालवतान सर्व संचालक मंडळाची व अधिकाऱ्यांची प्रामाणिक भावना आहे. सन २०२५-२६ च्या गाळपपासाठी कारखान्याची कामे पूर्ण झाले आहेत. यंदा कारखान्याचे ४ लाख गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकरी सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार अभिजीत पाटील यांनी केले. येत्या दिवाळी सणासाठी कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस म्हणून बक्षीस देणार असल्याचे आमदार पाटील यांनी जाहीर केले असून दिवाळी सणाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा.तुकाराम मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण बंद पडलेले साखर कारखाने अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन सुरू करतो, पुन्हा तो चेअरमन होतो, शेतकऱ्याचे पोरगं थेट जनतेच्या आर्शीवादाने आमदार झालं असून हि किमया फक्त आमदार अभिजीत पाटील यांच्या माणुसकीने कमावलेल्या माणसांमुळे आहे. अनेक संस्थांमधील शेतकरी सभासद, कामगार, वाहतूक ठेकेदार यांचे आशीर्वाद मिळाले आहेत.

यावेळी बापूसाहेब देहूकर महाराज म्हणाले की अगदी कमी काळामध्ये अभिजीत आबा पाटील यांनी आपल्या कार्याचा आलेख चढता ठेवला असून सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. माणसाने विश्वास संपादन केला की यश आपोआप मिळतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार अभिजीत पाटील असल्याचे देहूकर महाराज यांनी सांगितले.

यावेळी प्रस्ताविक नितीन पवार यांनी केले असून धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी कार्यक्रमात आभार मानले.

सदर प्रसंगी सांगोला साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वनाथ चव्हाण, शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, सदाशिव नवले, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, संतोष कांबळे, रणजित भोसले, संदीप खारे, संजय खरात, सुरेश सावंत, विकास काळे, सुहास शिंदे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close