संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा – अर्जुन चव्हाण
आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे मराठा महासंघाचे निवेदन
संपादक – दिनेश खंडेलवाल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा – अर्जुन चव्हाण
आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे मराठा महासंघाचे निवेदन
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील नव्हे तर मानवतेच्या मूल्यांना कलंकित करणारी घटना
मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने अत्यंत हृदय द्रावक आणि राक्षस वृत्तीची असल्याचे समाज माध्यमावर पसरत आहे.
देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा तसेच आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात सदर प्रकरण चालवावे अशी मागणी अ.भा. मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या छायाचित्रांनी स्पष्ट होत आहे. कृतीपेक्षा हा भयंकर प्रकार हृदय हलवून टाकणारा आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या केवळ खंडणीला विरोध केल्याने करण्यात आल्याचे पोलीस तपासा वरून लक्षात येते. संबंधित घटनेच्या मारहाण प्रकरणातील आरोपींना न्यायालयातून जामीन मिळल्यानंतर दोन दिवसांनी शांत डोक्यांनी प्लॅनिंग करून ही हत्या केल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही. पोलिसांचा वचक संपला का? कोणीही यावे आणि जीव घ्यावे, एवढी हिम्मत आली कुठून असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तहसीलदार सचिन लंगुटे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, युवक जिल्हा संघटक रोहित चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रभावती गायकवाड, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, शहर संघटक काका यादव, संत पेठ प्रमुख पांडुरंग शिंदे, शहर सचिव सचिन थिटे, युवक तालुका अध्यक्ष अमर शिंदे, कृषी तालुकाध्यक्ष औदुंबर डिसले, तसेच नानासाहेब शिंदे, मानसिंग सरदार, सोमनाथ खपाले, गणेश जगदाळे, विजय बनाली, राजेंद्र चव्हाण, किरण फाळके यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.