क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला-सौ. खाबाणी
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ येथे क्रांतिवीर सावित्रीबाई फुले जयंती साजरी
संपादक-दिनेश खंडेलवाल
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला-सौ. खाबाणी
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ येथे क्रांतिवीर सावित्रीबाई फुले जयंती साजरी
पंढरपूर : स्त्रियांनी चूल आणि मूल यामध्ये गुंतण्यापेक्षा त्यांना शिक्षणाची खरी गरज आहे. हे ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात महिलांसाठी पहिले शिक्षणाचे दार उघडले. त्यावेळी त्यांना अनेक परिस्थितीचा सामना करावा लागला परंतु आज मात्र स्त्रि प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण शिक्षण घेत आहेत. हे क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या योगदानामुळेच घडले त्यांनीच स्त्री शिक्षणाचा पाया रोवला यामुळे आज मुलीं प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी घेताना दिसत आहे. अशी प्रतिक्रिया उद्योजिका सौ.सरला श्रीनिवास खबाणी यांनी व्यक्त केली.
३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ येथे घेतलेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात समाजात मोठा बदल घडवला परंतु आजच्या परिस्थितीत आपण सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतानाही समाजासाठी काहीतरी का नाही करू शकत नाही? अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आजच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने विकासाच्या उंचीवर जाण्याचे ध्येय अंगी बाळगावे अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व बालिका दिनानिमित्त नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ येथे आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा,मेहंदी स्पर्धा, वेशभूषा,वक्तृत्व स्पर्धा,गीत गायन,संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम घेण्यात आले या सर्वांचे पर्यवेक्षणही सौ. खबाणी यांनी केले.
सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री बोडरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमासाठी श्रीमती नरवणे,श्रीमती पटेल,श्रीमती जाधव,श्री थोरात,श्री बळवंत यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती नरवणे यांनी केले कार्यक्रमाचे आभार शहाणे यांनी मानले सदर कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये पार पडला.