संघटनात्मक धोरणाबाबत सावता परिषदेचे राज्यभर संपर्क अभियान
अभियानाची सुरुवात आज पंढरीतून तर समारोप सिंदखेडराजा येथे होणार
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार सावता परिषद प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्यभर संपर्क अभियान आयोजित केल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सावता परिषद माळी समाजाचे राज्यव्यापी सक्रीय संघटन आहे. समाजाला दिशा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून कल्याण काका आखाडे यांनी केले आहे.सावता परिषदेच्या कार्याचा विस्तार राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आहे.जवळपास सत्तावीस जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य पोहोचलेले आहे.प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्यभर संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.दि.८ ऑक्टो ते ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत हे अभियान राज्यातील विविध जिल्ह्यात जिल्हा बैठका घेऊन समाज बांधव, पदाधिकारी यांच्या गाठी- भेटी व संघटनेच्या आगामी संघटनात्मक धोरणाबाबत चर्चा घडवून येणार आहे.
या अभियानाचे उद्घाटन श्रीश्रेञ पंढरपूर येथे तर समारोप मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे प्रदेश, विभाग पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.या अभियानात जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सावता परिषदेचे सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे यांनी केले आहे.