ईतर

मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण काढण्यास केली सुरुवात

मुंबईतील आराखडा बैठकीनंतरच अतिक्रमणाचा होणार निर्णय!

संपादक-दिनेश खंडेलवाल

मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण काढण्यास केली सुरुवात

मुंबईतील आराखडा बैठकीनंतरच अतिक्रमणाचा होणार निर्णय!

पंढरपूर न. पा. प्रशासनाने व्यापार्यांचे अतिक्रमण काढण्याचे जाहीर करताच पंढरीत व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती!

पंढरपूर : पंढरपूर शहरांमध्ये मंदिर परिसर आणि इतर ठिकाणी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याबाबत रिक्षा फिरताच शहरातील व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आणि चक्क आज मंदिर परिसरातील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने वाढवलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने सदरचा रस्ता हा मोठा दिसू लागला आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूरात केंद्र सरकारच्या वतीने कॅरीडोरच्या माध्यमातून विकास करत भाविकांना सोयी सुविधादेण्यासाठी
गेल्या अनेक दिवसापासून आराखड्याची अंमलबजावणी व कामास सुरुवात झाली असतानाच यामध्ये बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता.

भाविकांच्या सुविधेचे कारण पुढे करत प्रशासन नेहमीच मंदिर परिसरात अतिक्रमणाची मोहीम राबवत असल्याने यास व्यापाऱ्यांनी विरोध केला उपोषण आंदोलनातून लढा उभा केला मात्र दोन दिवसापूर्वीच पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील अतीक्रमण काढणार असल्याचे जाहीर करताच शहरातील मंदिर परिसरासह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आणि आज अतिक्रमण काढण्याच्या दिवशी मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी मात्र प्रशासनाचे अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच स्वतःच अतिक्रमण काढले.
दरम्यान नेहमी गजबजलेला असणारा गोपाळ कृष्ण मंदिर ते पश्चिम द्वार आणि नामदेव पायरी ते महाद्वार हा रस्ता आता मोठा दिसू लागला आहे.

मुंबईतील आराखडा बैठकीनंतरच अतिक्रमणाचा होणार निर्णय–

[दरम्यान या संदर्भात पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पंढरपूर विकास आराखडा संदर्भात चार-पाच दिवसात मुंबई येथे महत्त्वाच्या निर्णयावर बैठक होणार असून या बैठकीनंतर अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.]

वास्तविक पाहता मंदिर परिसरात प्रशासनाने भाविकांच्या सोयी सुविधेसाठी या परिसरातील रस्ता हा ४० फूट रुंदीचा केला होता परंतु अतिक्रमानामुळे हा रस्ता २५ फुटाचा दिसून येत असल्याने नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार असल्याचे जाहीर करताच व्यापाऱ्यांनी स्वतः अतिक्रमण काढल्यामुळे आता हा रस्ता पुन्हा एकदा ४० फुटाचा व प्रशस्त असा दिसू लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close