जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या धीरेंद्रशास्त्रीचा पंढरीत निषेध करत जोडे मारो आंदोलन
श्री गुरुदेव सेना व वारकरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आंदोलन
संपादक-दिनेश खंडेलवाल
जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या धीरेंद्रशास्त्रीचा पंढरीत निषेध करत जोडे मारो आंदोलन
श्री गुरुदेव सेना व वारकरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आंदोलन
पंढरपूर : पंढरपूर मध्ये सध्या माघी यात्रा सुरू असून या यात्रेच्या दरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री विरोधात श्री गुरुदेव सेना (राष्ट्रीय),समस्त वारकरी परिवारांच्या वतीने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत त्याचा निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनादरम्यान श्री गुरुदेव सेनेचे दिलीप भोईर म्हणाले की बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या एका प्रोग्राम मध्ये जाहीर रित्या वारकरी पंतांचे जेष्ठ संत जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांच्या पत्नी संदर्भात अभद्र वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे तमाम वारकरी लोकांच्या, वारकरी बांधवांच्या, वारकरी समाजाच्या आज प्रचंड भावना दुखावलेले आहेत.
ते वक्तव्य जगद्गुरु तुकोबारायांच्या व त्यांच्या पत्नीची बदनामी करणारे होतं त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्या वक्तव्याचा आणि धीरेंद्र शास्त्री यांचा जुतेमारो आंदोलन घेऊन निषेध नोंदविला आहे.
या महाराष्ट्रामध्ये कोणीही येतो आणि संत महापुरुषांची बदनामी करायला सुरुवात केरतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचे देखील मन दुखावले जात आहे. कुठेतरी सरकारने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि अशा वक्तव्य करणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई केली पाहिजे.
त्यामुळे आज ज्या वक्तव्याने आमच्या वारकरी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहे. त्या घटनेचा निषेध म्हणून धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला त्यांच्या फोटोला चपला मारून निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवला आहे.
यावेळी गुरुदेव सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी यांनी निषेधाच्या घोषणा देऊन संतांबद्दल कोणीही अपशब्द वापरू नये मात्र वापरल्यास अशाच प्रकारे जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येईल तसेच श्री गुरुदेव सेना गप्प बसणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.