राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांना पितृषोक
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांना पितृशोक झाले आहे. श्रीकांत शिंदे यांचे वडील नारायण विठ्ठल शिंदे हे आजारी असल्याने गेल्या काही दिवसापासून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्याच ठिकाणी त्यांचे उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
मृत्यू समयी ते ७१ वर्ष वयाचे होते. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी चांगले मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला होता. तसेच त्यांचे व्हॉलीबॉल व लेझीम या खेळात चांगले नाव होते.
श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे ते नौकरीस होते.
श्रीकांत शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून परिचीत आहेत.
श्रीकांत शिंदे यांचे वडील नारायण विठ्ठल शिंदे
यांच्या पश्चयात पत्नी, २ मुले,१ मुलगी,नातू असा परिवार आहे. येथील भूवैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.