राजकिय

सोलापूर लोकसभेसाठी अनुभवी,कार्यतत्पर माजी खा.अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी

जनतेची नाळ ओळखून विकासाभिमुख कार्य करणारा उमेदवार हवा

संपादक-दिनेश खंडेलवाल

सोलापूर लोकसभेसाठी अनुभवी,कार्यतत्पर माजी खा.अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी

जनतेची नाळ ओळखून विकासाभिमुख कार्य करणारा उमेदवार हवा

पंढरपूर : महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतसे सर्वच पक्षातील मातबर राजकीय नेते येणाऱ्या लोकसभा निवडणुकी साठी उमेदवारी आपल्यालाच मिळावी याबद्दल शर्तीचे प्रयत्न सर्व इच्छुक उमेदवार करताना दिसतात. सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असल्याने या जिल्ह्यातील अनेक जण लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सध्या तरी माजी खासदार तथा भाजपाचे उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या उमेदवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील जनतेतून व मतदारांकडून अमर साबळे यांच्या नावाची चर्चा सध्यातरी सुरू आहे.

अमर साबळे हे भाजपचे कमांडर प्रमुख अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे खंदे समर्थक अन् विश्वासू म्हणून ओळखले जातात.

त्याचबरोबर अमर साबळे हे भाजपचे उपाध्यक्ष व राज्य सभेचे खासदार असताना त्यांनी केंद्रीय विविध कमेटीवर चांगले उत्कृष्ट असे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय अभ्यासाचा फार मोठा अनुभव असल्यामुळे साबळे यांनी संसदेच्या अधिवेशनात ४८० प्रश्न उपस्थित करून विचारना केली होती. असे एकमेव खासदार म्हणून त्यांचा संसदेत चांगला परिचय आहे.

जनसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे, अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे असे व्यक्तिमत्व अमर साबळे यांच्यात आहे. तसेच अमर साबळे यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि ग्रामीण खेड्यापासून राजधानी पर्यंत एक चांगला राजकीय नेतृत्व असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सोलापूर जिल्ह्याचा मागील १० वर्षापासून रखडलेल्या विकास कामाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच तरुण युवक युवती यांची वाढलेली बेकारी हटविणे व त्यांच्या हाताला काम देऊन उद्योग व्यवसाय कसा वाढेल, त्यांची उन्नती कशी होईल, त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन प्रगती कशाप्रकारे करता येईल अशा अनेक त्रुटीवर मात करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा दावेदार, चाणक्य अभ्यासू व उत्कृष्ट नियोजन, चांगले नेतृत्व म्हणून ठसा असणारे भाजपचे अमर साबळे यांनाच उमेदवारी द्यावी अशी सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेची व मतदारांकडून मागणी होत आहे.

त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभेसाठी निवडणूक उमेदवार म्हणून भावी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा सोलापूर जिल्ह्यासह पक्षश्रेष्ठींमध्ये वरीष्ठ पातळीवर सुरू आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close