सामाजिक

सराईत गुन्हेगारांवर कारवाई करुन अचूक नियोजनाने यात्रा व निवडणूक शांततेत पार

पोलिस अधीक्षकांनी केला पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा सत्कार

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सराईत गुन्हेगारांवर कारवाई करुन अचूक नियोजनाने यात्रा व निवडणूक शांततेत पार

पोलिस अधीक्षकांनी केला पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा सत्कार

पंढरपूर(प्रतिनिधी):- सराईत गुन्हेगारांवर योग्य नियंत्रण मिळवून बंदोबस्तात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कार्तिक वारी व विधानसभा निवडणूक २०२४ प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडली. पंढरपूर उपविभागातील पोलीस ठाणेकडील गुन्हे अभिलेख तपासुन पोलीस ठाणेवार यादी तयार करण्यात आली. उत्तम नियोजन यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरपूर उपविभागातील पोलिस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

विभागातील गुन्हे अभिलेख तपासून पोलिस ठाणेवार यादी तयार करून वाळू तस्कर, शरीराविषयी, मालाविषयी, जुगारविषयक तसेच दारूविषयक गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. दरम्यान निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) प्रमाणे पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून ६९, पंढरपूर तालुका २९६, पंढरपूर ग्रामीण २७ तसेच करकंब पोलिस ठाण्याकडून २४ अशा एकूण पंढरपूर उपविभागातील ४१६ सराईत गुन्हेगारावर पंढरपूर शहर, तालुका व मंगळवेढा तालुक्यातून कार्तिक वारी व निवडणूक काळात प्रवेश बंदीचे आदेशाची बजावणी करून वरील सर्व सराईत गुन्हेगारांना पंढरपूर शहर, तालुका व मंगळवेढा तालुक्यातून मतदानाचा हक्क अबाधित ठेवून त्यांना पण हुसकावून लावण्यात आले.

वरील सराईत गुन्हेगारांना पंढरपुर शहर, तालुका व मंगळवेढा हददीत प्रवेशबंदी केलेने होणा-या संभाव्य गुन्हेगारी कृत्यांवर अंकुश ठेवण्यात यश आले व विधानसभा निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. तसेच पंढरपूर उपविभागातील पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील एमपीडीए कायदयांतर्गत ०१ वाळु तस्कर यास जिल्हाधिकारी यांनी एका वर्षासाठी येरवडा येथे स्थानबध्द केले तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे ०४ टोळी प्रमुख /टोळी सदस्य यांना ०६ महिने कालावधीकरीता, तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे १० सराईत गुन्हेगारांना यांना ०२ वर्षाकरीता तसेच पंढरपुर तालुका पोलीस ठाणेकडील ०६ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तर करकंब पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली.

पंढरपूर उपविभागातून २१ सराईत गुन्हेगारांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तसेच सराईत गुन्हेगारांवर योग्य नियंत्रण मिळवुन बंदोबस्तात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विधानसभा निवडणूक व कार्तिक वारी शांततेत पार पाडल्याबद्दल पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले,शहर पोनि. विश्वजीत घोडके, तालुका पोनि. तय्युब मुजावर, ग्रामीण पोनि. शिरीष हुंबे, पोनि. शंकर पटवारी व पंढरपूर उपविभागातील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करुन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close