पंढरपूर बस स्थानकात एसटीची समोरासमोर धडक होऊन झाला अपघात
एसटी बसचे नुकसान; वाहक जखमी प्रवासी सुखरूप
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर बस स्थानकात एसटीची समोरासमोर धडक होऊन झाला अपघात
एसटी बसचे नुकसान; वाहक जखमी प्रवासी सुखरूप
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक म्हणून पंढरपूरचे बस स्थानक ओळखले जाते. या बस स्थानकाच्या आवारातच आज दोन एसटीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याने पंढरपूर डेपोच्या पंढरपूर-परळ या एसटीचे मोठे नुकसान होऊन एसटीच्या समोरची काच फुटूली आहे. यामध्ये वाहकाच्या डाव्या हातात काच घुसल्याने हात रक्तबंबाळ झाला व ते जखमी झाले. मात्र दोन्हीही एसटीच्या प्रवाशांना काही झाले नाही.
दरम्यान स्थानक प्रमुख पंकज तोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघात झालेल्या एसटी बसची पाहणी केली व वाहकाला उपचारासाठी पाठवले दोन्ही एसटी बसमधील प्रवाशांना काय झाले आहे का? याबाबत चौकशी केली.
पंढरपूर बस स्थानकातून पंढरपूर-परळ एसटी क्रमांक एम एच १४/ के क्यू १२५८ ही परळ कडे जाण्यासाठी बाहेर निघत असताना बाहेरून बस स्थानकात वेगात आलेली तुळजापूर- देवगड एसटी क्रमांक एम एच २०/ बी जे २९१८ या एसटीच्या वाहकाच्या निम्म्या बाजूने परळ गाडी घासत गेली यामध्ये पंढरपूर परळ एसटीचे समोरील काच फुटून तसेच समोरील भाग फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. परळ एसटीची धडक होताच वाहक यांच्या डाव्या हातामध्ये फुटलेल्या काचा घुसल्याने त्यांचा हात रक्तबंबाळ झाला त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु दोन्ही एसटी बसमधील कोणत्याही प्रवाशाला काहीही न झाल्याने सर्व प्रवासी सुखरूप होते.
बस स्थानकातून बाहेर पडताना किंवा येताना चालक जर असे बेदरकार पणे वाहन चालवत असतील व त्यांच्या एका चुकीमुळे प्रवाशांना नाहक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चालकांनी संयम ठेवून वाहन चालवावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.